पान:अस्पृश्य -विचार.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५७ )

ज्याला राष्ट्रहिताची आणि धर्मकल्पनेची जाणीव असेल व त्याने जबाबदारीने या प्रश्नाचा विचार करावा आणि अस्पृश्यता काढावी.
 अस्पृश्यांना आमच्या धर्मात खसखशीतपणे अंतर्भूत केले पाहिजे. डॉ. कुर्तकोटी यांनी गेल्या दोन हिंदुधर्मपरिषदांत जे यश संपादिले आहे ते उमेदकारक आहे. ठराव पास झाले, पण आता पुढील विनंति ही की, या ठरावाला अनुरूप उपदेश करणारे प्रचारक श्रींनी चोहोकडे धाडले पाहिजेत. हक्क दिल्याच्या गौरवांत परिस्थितीचा पेंच ओळखल्याचे श्रेय आहे, पण त्याप्रमाणे घडवून आणण्यासाठी आपण होऊन यत्न केल्याने ती गोष्ट धर्मासाठी मनापासून पाहिजे असा अर्थ होईल. ' तुम्ही जन्मानें नीच आहांत ' हा उपदेश बंद करण्याचे आज्ञापत्र श्रींनी काढले पाहिजे. या सर्व कामांतील अवघडपणा माहीत असूनसुद्धां श्रींच्या कर्तबगारीकडे पाहून तें त्यांजपुढे मांडावेसे वाटते. तसेंच भागवत-धर्मियांनी आपली कोंडाळी फोडली पाहिजेत, व खरोखरीची धार्मिक उदारबुद्धि दाखविली पाहिजे. या बाबतीत त्यांच्याइतका अधिकार आज दुसऱ्या कोणालाहि नाही. औदायांत भागवतांच्यावर सरशी आजपर्यंत कोणी केली आहे ? शैवांनी एक सुप्रसिद्ध शिवाचे देवालय व भागवतांनी पंढरीचे देवालय कायम करून तेथें या लोकांना दर्शनासाठी तरी आज आंत घ्यावे. ऐक्यवर्धनाला या ठिकाणासारखी अत्यंत पवित्र जागा दुसरी कोणती कल्पिता येईल ? निराळी देवळे बांधावयाची कल्पना पुष्कळ दिवसांची आहे, पण त्रैवर्णिकांच्या धर्मबुद्धीवर अजून इतपत विश्वास आहे की, ते अजून औदार्य स्वीकारतील. असे वाटते. नुसत्या शंकराचायांच्या आज्ञापत्राला कोण विचारतो? हे युग एकानें बोलून सगळ्यांनी ऐकावयाचे असे नाही. सगळ्यांनी बोलावयाचे आहे. सर्वांनी पाठिंबा दिला तर आचार्याचे काम सुकर होईल. निराळे देवालय बांधणे म्हणजे त्रैवर्णिकांच्या हट्टाचे स्मारकच