पान:अस्पृश्य -विचार.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४५ )

दिलेली चांभारांच्या उत्पत्तीची हकीकत आधुनिक पद्धतीच्या शोधकांनी दिलेली आहे; असो. मराठी चांभारांचे अहिर, चेवळी, दाभोळी, घाटी, हरळी, कोंकणी इत्यादि भाग असून त्यांचे एकमेकांशी विवाहसंबंध होत नाहीत.
 त्यांतल्या त्यांत हरळी व दाभोळी हे स्वतःला चेवळी जातीपेक्षा श्रेष्ठ समजतात; कारण चेवळी जात हलक्या जातीचे जोडे नीट करते आणि मुर्दाड मांस खाते. यांच्यापैकीहि काही आडनावें ध्यानात ठेवण्यासारखी आहेत-भागवत, चव्हाण, देशमुख, देवरे, जाधव, कबाडे, कदम, काळे, पवार, सोनावणे, वाघ, शिंदे, सातपुते इत्यादि. यांचे धार्मिक विधि बहुशः ब्राह्मणच चालवितात. नगराकडे स्मशानविधीला यांना जंगम लोक लागतात.
 शेवटी अस्पृश्यांपैकी प्रमुख जातीची म्हणजे महारांची हकीकत द्यावयाची. ह्याच्या उत्पत्तीच्या कथा निरनिराळ्या तीनचार आहेत. कोणी महार समजतात की, ब्रम्हयाच्या तळव्यापासून स्वरूप सोमाजी महार निघाला त्याची प्रजा म्हणजे अंत्यजाची. कोणी म्हणतात, बेलाच्या पानावरील थेंबाचें पार्वतीने बालक केले, त्याने गाय मारून खाल्ली तेव्हां शिवाने शाप दिला की तूं ' महार हो.' तिसरे कोणी समजतात की, सोमाच्या म्हणजे चंद्राच्या डाव्या डोळ्यांतून आपण पडलो. हा चंद्र शिवाच्या मस्तकावर आहे हे सांगणे नकोच. हे सोमवंशी महार झाले. शेवटी काहींचें असें मत आहे की, गाईनें आपल्या चार मुलांना असे विचारिलें की, मी मेल्ये तर तुम्ही काय कराल ? पहिले तिघे म्हणाले, आम्ही तुझी पूजा करूं; पण चवथा म्हणाला की, मी उपजण्याच्यापूर्वी तूं जस मला आपल्या पोटांत ठेवले होतेस तसे मी तुला माझ्या पोटांत ठेवीन, म्हणजे मी तुला मटकावून टाकीन! अर्थात् याचा हा 'महा आहार'