Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४४ )

तील स्त्रियांना सुंदर वर्ण व रूपसंपदा ही लक्षात येण्याइतपत चांगली लाभलेली असतात, ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. चर्मकाराचा धंदा अगदी जुन्या वैदिक वाङ्मयांत व बुद्धपूर्व वाङ्मयांतहि उल्लेखिलेला आढळतो. त्या काळी या धंद्याला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. खुद्द राजे लोकांपाशीहि ओळख होण्याइतपत व संघट्टण घडण्याइतपत या धंद्यांतील पुढाऱ्यांना राजदरबारी आणि समाजांत मान असे. पुढे अंगी निष्प्रभता उत्पन्न करणारी बुद्धाची अहिंसा सगळीकडे पिकल्यावर जो तो असल्या धंद्यासंबंधाने खंती मानूं लागला, व तो धंदा करणारे लोक कमी प्रतीचे मानले जाऊ लागले. हळूहळू त्यांच्या विषयींचा तिटकारा वाढत जाऊन बाकीच्या अनार्याप्रमाणे त्यांनाहि बहिष्कृत व्हावे लागले. चांभार आर्यकुलोद्भव आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुढील गोष्टींचा निर्देश करण्यांत येतो. इतर अस्पृश्यांत जी नाही ती प्रेते जाळण्याची चाल त्यांच्यांत आहे; तसेच मृतांच्या अस्थि पवित्र नद्यांत टाकण्याची चालहि त्यांच्यांत आहे. शिवाय श्राद्धपक्ष करून हे लोक ब्राह्मणाला दक्षिणा देतात व गोमांस अत्यंत निंद्य समजतात. असो. एखादी जात अनार्य म्हटल्याने ती अगदी कुचकामाची ठरते असा काही नियम नाही. पण शौर्य, पराक्रम. विद्याभिरुचि, कलाकौशल्याची वाढ, परमार्थज्ञान इत्यादि बाबतींत इतिहासाला आठवण नाही तेव्हांपासून तहत आतांपर्यंत ज्या आर्यवंशजांनी अमर असा नांवलौकिक मिळविला त्यांपैकी आपण आहोत असे वाटून चांभाराच्या रक्ताला हुरूपाने उसळी मिळाली तर त्यांत काय नवल? एखाद्या जातीच्या उत्पत्तीच्या ज्या निरनिराळ्या उपपत्त्या अडाणी व कदाचित् लुच्च्या लोकांनी बसविलेल्या असतात त्या सर्वांची एकवाक्यता कधीच घडून यावयाची नाही, व या उपपत्ति जो जो जुन्या तों तो त्यांच्याविषयी शंकाकुशंका फार; कारण त्या बुद्धीला ग्राह्य वाटेनाशा होतात. वर