पान:अस्पृश्य -विचार.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २७ )

वर टाकावयाचा, तसा जरीमरीला ' अंड्यांचा गुडघ्याइतका ढीग ' वहावयाचा इतकाच त्याचा अर्थ. अशा प्रकारच्या थोरांच्या हयगयींत सांपडल्यामुळे अस्पृश्याच्या मनाची वाढ कधीहि पूर्ण होत नाही. आणि ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या तीन धूर्तानी ' तूं हलकटच, तूं हलकटच ' असे वारंवार म्हटल्याने त्याला खरोखरीच असा वहीम येतो की, आपण हलकटच आहो! असल्या मनोदास्यांतून त्याची सुटका जो जो करील तो तो त्या अस्पृश्याचा उपकारकर्ता. या हीन मनस्कतेच्या जोडीला मागील भागांत सांगितलेली धंद्यांची नागवणूक आणून बसवा, म्हणजे महार लोक खिस्ती का होतात याची कारणे एकदम कळतील.
 खिस्ती मिशनरी आपले मठ स्थापीत सुटला म्हणजे सहाजिकच मोठे वैषम्य वाटते. अज्ञानाचा खच जेथे जास्त आणि दुष्काळाची कृपाहि जेथें जाडी, तेथें मिशनन्यांच्या कामांचा झपाटा फार. पण भाकरी मिळेनाशी झाली आणि मनाला विशेषसा मागचा ओढा नसला म्हणजे धर्मातर करण्याकडे प्रवृत्ति व्हावी यांत काय नवल ? एक वर्ष पाऊस पडला नाही की अन्नान्नदशा व्हावी या गोष्टींचे श्रेय अर्थात् आपल्या दयाळ् राज्यकर्त्यांकडून हिसकून घेण्याचा कोणाचा अधिकार असणार ? पण स्वराज्याचा अभाव हे एक महाकारण प्रत्येक ठिकाणी सांगून सुटका करून घेणे इष्ट नाही आणि आपण सर्वत्र तसें करीतहि नाही. दुष्काळ पडल्याबरोबर आमचे शंकराचार्य जर दुष्काळाच्या प्रांती गेले, घरोघर हिंडले, वर्गण्या, देणग्या, पुड्या, एकत्र करून धर्मरक्षणाला सरसावले तर खिस्ती मिशनऱ्यांचा पाड काय लागला आहे ? त्यांचे प्रयत्न कुंठित करण्याला आपले प्रयत्न काय होत आहेत? आपल्या दरिद्रीपणामुळे ज्या प्रमाणावर हे प्रयत्न व्हावयास पाहिजेत त्या प्रमाणावर व्हावयाचे नाहीत हे उघड आहे. पण अल्पस्वल्पावरून सुद्धा आपली जागरूकता