पान:अस्पृश्य -विचार.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २८ )

व हेतु ही सिद्ध होतील, हे निर्विवाद आहे. संकटाच्या प्रसंगी जर वांचवावयास जावयाचे नाही तर मग केव्हां? संबंध हिंदुस्तानांत प्रतिवर्षी सवा लाख हिंदू ख्रिस्ती होतात असा हिशेब आहे, पण दक्षिणहिंदुस्तानांत ख्रिस्ती करण्याचा तडाखा फार यशस्वी होत असतो. आपल्याकडे अगदी सर्कतवांटणीने जरी प्रमाण आले नाही. तरी गांवोगांव जे खिस्त्यांचे मठ दिसतात ते निचेष्ट आहेत असे कधीहि मानतां यावयाचे नाही. त्यांचे पोखरणे चालूच असते. नगर जिल्ह्याकडे जाऊन पाहावे म्हणजे पसरत चाललेल्या धर्मातराची बाब नीट ध्यानात येईल. काही थोड्याच वर्षात दुष्काळांच्या मेहरबानीने आणि आमच्या उपेक्षेने सध्या लाखांनी मोजतां येण्यासारखी खिस्ती प्रजा कोटीवर खास जाईल. इंग्लंड व अमेरिका इकडचे पाद्री लोक कोट्यवधि रुपयांचा फंड उभारून हिंदुस्तानात येणार असून खेड्यापाड्यांतून सुद्धा आपल्या शाळा, मठ, दवाखाने सुरू करणार आहेत अशी बातमी एक वर्षापूर्वी वाचल्याचे वाचकांना स्मरत असेल. ही गोष्ट अशक्य नाही. शिसारी येण्याइतकी संपत्ति कांहीं ऐद्यांच्या हाती तिकडे जमा होत असते; ती धर्मकृत्यांत खर्चीवयास ते केव्हांहि तत्परच असणार. आणि ही ख्रिस्ती भिक्षुकांची स्वारी खिस्ती राजाच्या आश्रयाखाली एकदां का सुरू झाली म्हणजे दोन ठिकाणी विभागलेला हा हिंदुस्थान देश एकंदर तीन ठिकाणी फाटणार असा त्याचा सरळ अर्थ होईल. एक कोटि ख्रिस्ती प्रजा म्हणजे एक मोठा जबरदस्त लोढणा होऊन बसणार आहे. धर्माचा समानपणा हा पुष्कळदां एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेलाहि मागे टाकतो हे डोळे उघडून पाहणारास सहज दिसण्यासारखे आहे. मनाने या ख्रिस्ती लोकांचा ओढा खिस्ती राज्यकर्त्याकडे राहीलच राहील; व राहत नाहीसा दिसला तर हरहुन्नर करून राज्य टिकवू पाहणारा अधिकारी आपल्या हातांतील