Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १९ )

तून आपल्याला सोडवून घेऊन ज्या समाजव्यवस्था व जी तत्वज्ञानें, केवळ ग्रंथालयांत नव्हे तर समाजाच्या घरींदारी, व्यवहारांत आणि मनःप्रकृतीत कायमची रुजलेली दिसतात, त्यांच्या अंगांत कांही जातिवंत स्थैर्य आहे असे मानावयास काही हरकत नाही. टिकलेल्या हिंदूसमाजाला एवढे टिकाऊ रुप देणारे काही बंधन, नियम व तत्त्वज्ञान खास होतेच होते. पण ह्या पूर्वकालीन आधारभूत गोष्टींच्या गौरवांत मन सारखे राहू दिले तर वर्तमानकालीन जगाकडे अगदी दुर्लक्ष केल्यासारखे होते आणि म्हणून आपल्या समाजाच्या हिताची काळजी वाहणाऱ्या प्रत्येकानें, परंपरागत गोष्टींबद्दल आदर बाळगूनसुद्धां, नवीन विचार केला तर त्यांत काय बरे वावगे होईल ?
 ज्याने त्याने आपापली कर्तव्ये करावीत हे वाक्य मोठे कर्णमधुर आहे, पण त्याची अंमलबजावणी स्वतःच्या चारित्र्यांत करितांना त्यांतील मधुरता नाहीशी होते. मी हेच कर्म का करावे असें महाराने विचारले तर गीतादि ग्रंथांतील वाक्ये उद्धृत करून त्याच्या धर्मबुद्धीला आव्हान करावे आणि आपला उपदेश त्याला पटवावा अशी नीति लोक आचरतात. पण हे पांडित्य फक्त परोपदेशांतच नांदतें, ह्या गोष्टीची आठवण एकमेकांना देणे कदाचित् गैरसोयीचे असेल, पण जरूर मात्र आहे. " भगवंतांनी लावून दिलेले " ब्राह्मणाचे कर्म कोणते ब्राह्मण आचरीत आहेत ? अध्ययनअध्यापनादि कर्मे जशा प्रकारें ब्राह्मण लोक सध्या करतात त्याच प्रकाराने करणे जर धर्मसंमत असेल तर धर्माला कांहींच उच्च ध्येय नाही असा त्याचा अर्थ होईल. पोट भरावे म्हणून जशा प्रकारचे ज्ञान अमुक एक प्रकारे सांगावे असे वरून सांगण्यात येईल त्याच प्रकारचे ज्ञान ब्राह्मण शिक्षक देत असतो हे एक; शिवाय कोणी लोखंडाचे दुकान घालून बोहरी होतो; कोणी शिंपी लोकांना बाजारपेठेत जागा महाग करतो, कोणी खेडेगांवांत राहून ' आपली वृत्ति