विसरून गहाणे डुलवावयास शिकतो, आणि कदाचित् कोणी कोणी एकीकडे ब्राह्मण्याचा जळजळीत अभिमान बाळगून सुद्धा, सुधारकांना निंदून सुद्धां, उत्तम कांचेच्या कपाटांत "श्रीक्षेत्र वाईहून" आणलेले सुंदर लाल जोडे ठेवून विकावयास उभा राहतो. ज्या सेवाधर्माला म्हणजे नोकरीला धर्मग्रंथांत श्वानवृत्ति असें नांव दिले आहे तीवरच केवळ ब्राह्मणसमाज तगून आहे. हे ब्राह्मणांविषयी झाले पण जसे ब्राह्मण तसेच क्षत्रिय ही वर्णाश्रमधर्माचे मोठे अभिमानी असतात. त्यांनाहि असे विचारणे जरूर आहे की, आपल्या क्षत्रियत्वाचे काय झाले? सध्या आपल्या तरवारी कोठे आहेत. गेल्या दिवाळीत प्रस्तुत लेखक नगर जिल्ह्यांत फिरत असतां एका मराठा गृहस्थाने 'कुटेल आमारावर मराठ्यांचे लढणे' हे त्यांच्या क्षत्रियत्वांचे निदर्शक म्हणून सांगितलें! खरोखर हे उत्तर अत्यंत विषाद उत्पन्न करते. कोण, कोणासाठी, कोठे लढतो ह्या त्रिकोणाच्या पोटांत वरील विषादवृत्तीची मीमांसा सांठविलेली आहे, हे सुज्ञ वाचकांस सांगावयास नको. शिवाय आपलें जन्मजात कर्तव्य म्हणूनच जर क्षत्रिय द्वीपांतरी गेले असते तर रंगरूटें पकडण्यासाठी जुने बाजार का धुंडावे लागते? आणि मुंडण करून गोसाव्यांची रंगरूटें कां करावी लागली असती? वैश्यांचहि असेंच आहे. खाली गळलेल्या बुंदीच्या कळ्या खा-खाऊन पुष्ट झालेल्या वाढप्यापेक्षा वैश्यांची जास्त मातब्बरी नाही. वरील मजकूर कोणाला खिजविण्यासाठी लिहिला नाही. आपद्ग्रस्ताला खिजविण्यांत कोणते शौर्य? पण वस्तुस्थितीच्या यथादर्शनासाठी लिहिलेला आहे. परोपदेशाला प्रवृत्त होण्याच्या आधी आत्मशोधन थोडेसें करावें हे व्यवहारदृष्टया योग्य होईल, म्हणून तुझें काम तूं कर असें महाराला प्रतिपादण्यांत कांहींच गौरव नाही. जसे आपण बाकीचे लोक आपला संसार सुखाचा करण्यासाठी प्रसंग पडेल त्याप्रमाणे आचार
पान:अस्पृश्य -विचार.pdf/23
Appearance