पान:अस्पृश्य -विचार.pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३ )

लोकांची, हिमालयाच्या पहाडापलीकडील धटिंगणांची व आमची भांडणें पिकविण्याचे किती तरी हुकूम शिल्लक आहेत पण सगळ्यात जोराचा हुकूम झणजे अस्पृश्यता ! त्याच्यांतून कारकूनही सांपडतील आणि शिपाईहि सांपडतील. या गोष्टी हटकून यशस्वी होतील असे मुळीच ह्मणावयाचे नाही. पण आजचे मरण उद्यांवर ढकलण्यास आणि येथील केवळ एतद्देशीय राजकारण क्षेत्रांत धुल्ला माजविण्यास ही पुरेशी सोय आहे. एखादी प्रचंड सभा पांचपन्नास माणसांना गिल्ला माजवून सहज उधळून देतां येते आणि हाता तोंडाला आलेले यश आपल्यांतील विचक्यामुळे पदरी पडेनासे होते हे ध्यानात पाहिजे. शिवाय दुसरी एक जाचणूक उत्पन्न होण्याचा संभव आहे. राजकीय हक्काची ढकलाढकली होऊ लागली आणि तीहि अस्पृश्यांच्या ' फटकूनच राहीन ' या ह्मणण्याच्या बळावर; तर आपले मुसलमानबंधूहि असें ह्मणूं लागण्याचा संभव आहे की, ही तुमची भांडणे आतां आवरती घ्या, तर ती शिकवण इतरांकडून येण्याच्या आधीच आपलें घर आपण साफसूफ केलेले बरे. पण हे सगळे अगदी आजच्या संबंधाने झाले. ही भूमिका फारशी उंच नाही. वर सांगितलेली देशप्रेमाची गोष्ट मात्र अगदी भिन्न आहे. हिंदुस्थान स्वतंत्र व्हावयास पाहिजे म्हणून हा प्रश्न निकालांत निघणे जितकें जरूर आहे त्याहीपेक्षां तो स्वतंत्र झाल्यावर तसाच राहावा यासाठी जास्त जरूर आहे. महारापोरापर्यंत स्वदेशाभिमान सकारण पोंचला म्हणजे कसल्याही शत्रूला भिण्याची आम्हांला जरूरी नाही. पण स्वदेशांतच मानमरातबाने राहावयास सांपडल्यामुळे जरी देशप्रेम वाढू लागले तरी एकंदर समाजाशी एकदिल होणे अवश्य आहे. आणि हा एकदिल वरील समाजाने औदार्य दाखविल्याशिवाय व अर्थात् अस्पृश्यांनी आपल्या सुधारणा झटाझट करण्याची तत्परता दाख-