पान:अस्पृश्य -विचार.pdf/15

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १२ )

अशरण आहे आणि निराश्रित आहे लाथाडलांत तरी ' माईसाहेब मी तुमचाच ' असें तो म्हणणार.
 ही स्थिति त्याच्या समाजाच्या दृष्टीने तर आहेच. पण एकंदर आपल्या भवितव्यतेच्या दृष्टीनेंहि मनांत उतरवून घेण्यासारखी आहे. आपण राजकारणाविषयी बोलत आहों. ज्या देशांतील पांचसहा कोटि प्रजांना स्वदेशाभिमानाची अवश्य कारणे चांचपूनसुद्धा सांपडत नाहीत , त्या देशाला आपल्या राजकारणाची चांगलीच खबरदारी घ्यावयास पाहिजे. उद्यां जर दुसरीकडे कोठे मोठी वसाहत करावयास मुबलक जागा मिळाली आणि सर्व सुखसोयी आहेत असे कळलें तर सहस्त्रावधि अस्पृश्य देशांतर करतील आणि ' करणार नाही ' असे जर कोणी म्हटले तर ते अशक्य म्हणून , बाकीचे स्वकीय येथे राहणार आणि वर सांगितलेली बाब अशक्य आहे म्हणून. उगाच खरी गोष्ट चोरण्यांत काय मतलब ? पण तो येथलाच आहे , तुम्ही यावयाच्या आधींचा आहे , येथे राहण्याचा त्याचा हक्क आहे, ही त्याची जन्मभूमि आहे ; मात्र त्याच्या घरीच कहर झाला आहे , हा कहर बंद करावा. हिंदुस्थानावर प्रेम करावयास सबळ कारणे त्याला दिली पाहिजेत तर तो परकी सत्तेला आपल्यासारखा विन्मुख होईल. राजकारणाच्या यशाला आपल्यांतल्या फुटीर दर्जा चांगल्या भरल्या पाहिजेत. भेदनीतीने राज्य करणे इतरांसारखेंच अथवा इतरांपेक्षा आपल्या आंग्रेज बहादरांना चांगले साधले आहे. चिलखताचा सांधा दिसे न दिसेसा असला तरी त्यावर अचूक तीर मारण्यास जो चुकत नाही तो उघड उघड भगदडावर न मारील तर मूर्ख ! भेदनीतीच्या खेळाला आरंभ झालेलाच आहे. त्याच्या पदरी लोभवून टाकणारी आमिषे फार आहेत. ज्याला पूर्वीचा काही चिकटा असेल तो सहसा फसणार नाही. पण नसेल तर केवळ तद्रूपता पावेल. अजून जातिजातींची , हिंदूमुसलमानांची , भिन्न भिन्न प्रांतांतील लढवय्या