पान:अशोक.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांव-मुकादमानी. g: मोकदम (मुख्य अदमी) हा किताब पाटलाला असे. पाटील-चौगुल्याखेरीज सोनार, शेटे, सुतार, माळी, कुंभार, परीट, तेली, मठपती, वगैरे स्पृश्यजातींच्या वतनदारांना ' बाजेवतनदार ? (बाज म्हणजे संपादन केलेला, गुणी, जसे तालिमबाज) म्हणत. परंतु साधारणतः गांवचे सगळे श्रेष्ठ वतनदार * गांव-मुकादम ' या नांवाखालीं मोडत. त्यांच्या सामान्यतः तीन ओळी किंवा प्रती करतात, त्या येणेप्रमाणें-पहिली ओळ: सुतार लोहार, चांभार, महार; दुसरी ओळ: कुंभार, मांग, परीट, न्हावी; तिसरी ओळः जोशी किंवा भट, मुलाना, गुरव, कोळी. बलुतदारांची वरीलप्रमाणें सर्वत्र प्रतबंदी आहे, असें नाहीं. काश्रूंचा भरणा, काळी-पांढरीच्या मानानें प्रत्येकाच्या कामाची निकड, ह्या व अशाप्रकारच्या दुस-या कांहीं कारणांचा विचार करून ज्या त्या परगण्यानें (कोटें कोटें गांवानें ) आपापल्या सोयीप्रमाणें कारूंची प्रतवारी पहिल्यानें लावली; आणि पुढ़ें जसजशीं प्रथमचीं कारणें कायम राहिलीं, अगर बदलत गेलीं, किंवा नाहींशीं झालीं, तसतसे ह्या ओळींतले कारू त्या ओळींत गेले, किंवा अजिबात कारूंतून नारूंत उतरले, आणि नारूंतले लोक कारूंत चढले. जागल्या, वेसकर वगैरे महारकीच्याच कामाचे पोटविभाग असल्यामुळे अनेक ठिकाणीं हीं सर्व कामें महार करतात, आणि तिन्ही ओळींचें बलुतें घेतात. पाटील, कुळकर्णी हेही बलुतदार होते, आणि ते आपले चाकरीबद्दल गांवक-यांकडून परभा-याचें ऐन जिनसीं उत्पन्न घेत. वतनदार गांवमुकादमांचीं पूर्वीचीं कामें व आतांचीं कामें ह्यांत पुष्कळ फरक पडला आहे. परंतु सरकारउपयोगी गांवकामगार ह्यांच्या पूर्वीच्या व आतांच्या १ अव्वल इंग्रजीत इंदापूर परगण्यांत कारूंची संख्या १४ हेोती व प्रतिवारी येणेंप्रमाणें हेोती-पहिली ओळ:-सुतार, लोहार, चांभार, महार; दुसरी ओळ:- कंभार, न्हावी, परीट, मांग; तिसरी ओळ:-सोनार, मुलाना, गुरव, जोशी, कॅळी, रामोशी. पंढरपूर परगण्यांत त्यांची संख्या १२ असून प्रतवारी येणेंप्रमाणें हेोती-पहिली ओळः-महार, सुतार,लोहार, चांभार; दुसरी ओळ:-परीट, कुंभार, न्हावी, मांग; तिसरी ओळ:-कुळकर्णी, जोशी, गुरन, पोतदार,