पान:अर्धचंद्र.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ية ग्रस्तावना चिरंजीव पण्डित सप्रे यांनीं, लोकांना अर्धचन्द्र देण्याकरितां आपला हात उगारला, तों सानिध्यामुळे मीच प्रथम सांपडलों, आणि एकदां त्यांच्या तडाख्यांत सांपडल्यावर कोण सुटणार? वास्तविक पाहतां रूढ | संकेत खणून काढण्याकरितां बद्धपरिकर झालेल्या पण्डित सप्रेसारख्या ' नववीरांनीं प्रस्तावनेचा उपचार पार’झुगारून द्यावयास पाहिजे होता. एक तर रसिकांना त्यांची नवीन ओळख करून देण्याइतके ते अप्रसिद्ध नाहींत. ‘ अधिकस्य अधिक फलम्' या व्यवहार-नीतीनें विचार केला तर, या कामीं · त्यांनीं केलेली माझी योजना विपरीतच ठरेल. आपल्या अंगच्या अभिजात विनग्रामुळे ते स्वतःची योग्यता जाणीत नसतील हें मला मान्य आहे. एक होकार होतो, या लहानपणीं माझ्याकडून शिकलेल्या भाषासिद्धांतामुळे त्यांची फसगत झाली असावी. पण दोन अप्रसिद्ध एक झाले म्हणून ते प्रसिद्धि कशी मिळविणार? आपल्या संस्कृतीच्या मुशींत ओतलेल्या त्यांच्या मनाला, कदाचित्, त्यांनीच एका कवितेंत म्हटल्याप्रमाणें ' गुरुजन दिसतां वंदन करणें । हें सहजप्राप्त कर्तव्य वाटलें असावें. बाकी. एवढे खरें कीं, त्यांच्या काव्यांतील गूढार्थाच्या कोड्यापेक्षांही, प्रस्तावना-लेखक म्हणून माझी केलेली निवड अधिक कोडे उत्पन्न करते. माझ्यामुळे त्यांना यत्किचितही लाभ होण्यासारखा नाही; पण 'पण्डित 'सप्रे यांच्या अर्धचन्द्राचे प्रस्तावक' म्हणून साहित्यक्षेत्रांत मला मात्र दीघायुषी होण्याचा योग दिसतो. पदोपदीं सलणारा कांटा, जसा कुशल कारागीर बोल बोल म्हणतां काढून तळहातावर घेऊन दाखवितो, क्षणापूर्वी नको नको म्हणणारा भित्रा मालकही, तो तुळतुळीत तीक्षण काळा कांटा पाहून कौतुकानें खुलतो, तसेंच, पण्डित सप्रे यांच्या या अर्धचन्द्राकडे लोक पाहतील. समाजाच्या पायांत बोचणारे कितीक कांटे काढून घेतलेले यांत सांपडतील. सिहासारखा आपला समाज पण मर्मस्थानीं रुतलेल्या असंख्य शल्यांनी तो अगदीं