पान:अर्धचंद्र.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांगण्यापासून तों तें प्रकाशित करतांना येणार्या बारीकसारीक अडचणी दूर करण्यापर्यंत आपुलकीनें व थोर मनाने जी मदत केली; श्री. मामासाहेब दाते यांनी व्यावहारिक अडचणींची झळ मला न पोंचं देतांही उत्कृष्ट व झटपट छपाई करून देऊन जो सहानुभूति दाखविली आणि गु. पाठक यांनी मामिक प्रस्तावना लिहून जें प्रेम व्यक्त केले त्या सर्वांमुळेच मी हें पुस्तक प्रकाशित करण्यास धजलों हैं कृतज्ञतापूर्वक नमूद करणं मी माझे कर्तव्य समजतों. त्याचप्रमाणे श्री. दादासाहेब कुलकर्णीं व मि. रामभाऊ भोगे यांच्या हार्दीक सहानुभूतीबद्दल व वेळोवेळ दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी सदैव त्रणी आहें अशा या काव्यकलापूर्ण संग्रहाचे, मराठी वाङमयप्रेमी रसिक योग्य तें चीज करतील व ‘ प्रकाश मंडळा'च्या पुढील कायस सक्रिय सहानुभूति दाखवतील अशी मी आशा बाळगतों. दयार्णव कोपर्धेकर २५-३-३८.