पान:अर्धचंद्र.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकाशकाचे दोन शब्द उदयोन्मख व कलापूर्ण ‘अर्धचंद्रा में प्रकाश मंडळ'च्या बामय- सेवेस प्रारंभ करण्याचा सुयोग जमून आल्याबद्दल मला फार आनंद वाटत . प्रकाशनांची जबाबदारी घेणें मजसारख्या केवळ श्रमजीवी मनष्यास "बरच धोक्याचें; विशेषत काव्यसंग्रहाचे प्रकाशन व ते नवोदित कवि, अननुभवी प्रकाशक व अपरिचित प्रस्तावनालेखक यांनीं जमवून आणा- वयाचेयावरून सर्वच वेड्यांचा बाजार असेंही व्यवहारी माणसास वाटले तर त्यांत काय चुकीचे आहे ? आणि मलाही या गोष्टीची जाणीव नव्हती असे नव्हे. तथापि विशेष गुणांमुळे कांहीं व्यंगै जशीं लोपली जातात तद्वतच प्रस्तुत प्रकाशनासंबंध आहे असे प्रांजलपणे सांगण्यास मला मुळीच संकोच वाटत नाही. माझे मित्र कवि श्री. पंडितराव सप्रे हे काव्यसंग्रहाचे लेखक या नात्याने जरी आजच परिचित होत असले तरी त्यांच्या सुंदर काव्यांचा आस्वाद रसिक वाचकांनी यापूर्वीच ज्ञानप्रकाश, सकाळ, सहयाद्रिइत्यादि नियतकालिकांतून घेतला आहेइतकेच नव्हे तर प्रि. अत्रे, श्री. वि. स. खांडेकर, कवि गिरीश यांसारख्या थोर साहित्यिकांकडून मामिकता, कल्पकता, सूक्ष्म विनोद व उपरोध या त्यांच्या काव्यगुणांबद्दल अंतःकरण पूर्वक प्रशंसोद्गारही निघाले आहेत. इतकें सांगितलें असतां हा 'अर्धचंद्र प्रकाश मंडळा'च्या उगमस्थानीं युक्तच होय याबद्दल निराळी तरफदारी प्रबयास नकोच. प्रस्तावनालेखक गु. पाठक हे किती मामिक टीकाकार आहेत हे त्यांनी लिहिलेल्या प्रस्तुत पुस्तकाच्या सुंदर प्रस्तावनेवरूनही कळून येईल. माझ्या प्रकाशनानुभवाचे बाबतीत मात्र मला इतक्या उच्च प्रकारचे पुष्टिपत्र नाही. आतांपर्यंत पुस्तकें छापविण्याबाबत प्रसाराबद्दल व त्याच्या जरी मी गेली चार वर्षा अनुभव घेतला असला तरी सुप्रसिद्ध लघुकथा लेखक श्री. यशवंतराव जोशी यांनी पुस्तक प्रकाशनास योग्य आहे असे