पान:अर्धचंद्र.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्चचंद्र ३९ साध्याही विषयाँत हातीं पुस्तक घेउनी सहज मी खोलींत दारांतल्या होतों वाट तुझी पहात कर्धि तूं येशल माइया घरीं ! [झाली आज मजाच और ! मजला ती सारखी आठवे साध्याही विषयांत आशय कधीं मोठा किती आढळे!] होता वाळत घालण्यांत कपडे दारी कुणी गुंतला तेव्हां आलिस तूंकिती किति मला आराम गे वाटला! • वाटे गंमत की अकल्पिक असा हा योग आला कसा अंतपट नि हा मर्धेच बनुनी दोघांमधे राहिला ! -येतें पाहुनिया मनांत अपुले हें संपले दुर्दिन ! सौख्याचीं दिसती म्हणून सगळीं हीं गोडशीं सूचितें ! ५-१-३४ क-हाड. आमचीं स्मारकें !- -आणि मित्रासमवेत जिथें आम्हीं पुलावरती बैसून मजा केली ! त्याच जागेवर पहा आज कांहीं गोड पोरी बसतात हवा खात ! -आणि त्यांना बघतांच तिथें सारे दिवस पूर्वीचे स्मरतात ते मजेचे ! काव्यमय हया रमणीय स्मारकोसी बघुन होतो आनंद किति जिवासी ! १५-२-३४ पुणे.