पान:अर्धचंद्र.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ अर्धचंद्र शोभनेप्रत भद्रायू-- मग एकामागुन एक असे सुंदर काव्याचे माझे संग्रह येतिल पुढे ! जग करिल त्यांचे स्वागत गे ! हार्दिक पत्रांचे भरतिल आणि रकाने किती ! —येतांच पुढे कविसंमेलन शोभने ! अध्यक्ष तिरों का मजविण दुसरा दिसे ? येईल तुला मग कळ्नी मम लायकी ! परि उगाच दातुं कशास तें बोलुनी ? -जातील साठ मम वयास वर्षे जधीं नाचेल तद जग घेउन मजळ शिर ! जें भाग्य न लाधे नृपासही, तें मळा- पाहतां मती तव होईल गे! कुंठित ! -मग अखेर गाणीं एक दिनीं आपुलीं गे ! गात गात जाईन धरा सोडुनी ! हळूहळेल सारें जग हें माझ्यास्तव ! देतील तिलांजलि रसिकहि लक्षावधी ! प्रतिवार्षिक नंतर गांबागांवांतुनी होतील सुरु मम उत्सव शोभावती ! नामांकित वक्ते गातिल माझा स्तुती येईल तुझ्या तें सारे कानावरी ! निदखास तदा तू बसशिल गे! टाकित ! म्हणशल आणि : * कशि चूक अशी जाहली ! ” ४-१-३५ कहाड. 1