पान:अर्धचंद्र.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धचंद्र एक पापी– देव :– “ पापकृत्यें सोडून सुकल देई खुला म्हणजे होईल तुला स्वर्ग' पापी :-* खरें सारें-हातचें सर्वे आधीं सोडुनी कां धरुं हाव दूरची मी? इथे जैसें सुख भोगणें मजेनें तसें कायम मिळणार सौख्य तेथें ! घास मुखिचा मम आज काढुनीया दु:खपंकीं ढकलसी तू कशाला ? सुखापासुनि मज दूर नेउनीया धनी पापाचा होसि तूं कशाला ? असा राहुनि राहुनी दूर देवा ! मानवांना बघतोस तूं कशाला? जवळ येउनि हृदयांत जरा राही आणि सारें बघ नीट न्यहाळूनी ! कळुनि येइल मग तुला सर्व कांहीं आणि करशिल तूं क्षमाही अखेरी ! २१-३-३४ पुणें. マく