पान:अर्धचंद्र.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ अर्धचंद्र शर –म्हणतात गुणावर प्रीती जडते जगीं विपरीत परंतू दिसतें मज सर्वही ! उधळून टाकितां येतिल ऐसे किती गुण होते तरिही प्रीति न त्या लाधली ! २८-१०-३१ कन्हाड. YRA तुं आणि म्यु. दिवा --दिवा रस्त्यांतला जैसा। तसा आहे तुझा प्रेमा ! न दावी मार्ग पांथस्था ! न होई साहय वा त्याला ! २५-३-३३ पुणे. प्रीति सख्या रे! प्रीतिचा सौदा तुला का वाटला सोपा ? चहा कीं गोडसा जैसा कुणींही घेउनी प्यावा ? कुणीही गात बैसावी अशी का प्रीत ही सोपी ? न तैशी प्रीत ही सोपी लिपी ती फारसी उलटी ! २५-३-३३ पुणे.