पान:अर्धचंद्र.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

༢ अर्धचं समुद्रमंथन लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक अशों रत्नें निघूं लागलीं साक्षात् अमृत ये वरी तरि कुणीं नाहीं समाधानले ! लागे हाव सुटावया-हळुहळू आलें अखेरी वरीचौदावें मग रत्न तें निधुनिया-तों सर्व थंडावलें ! १५-१२-३० पुणे. पुनर्जन्म - विद्यार्थी असतां कळून चुकतें आहे पुनर्जन्म हें ! जेव्हां तो इतिहास-तास छळण्या जीवास या येतसे. गेले हाय ; कितीक वीर अपुल्या शत्रूस भंडावुनी! गेले आणि कितीक वीर करुनी कामें भलीं थोरलीं! सारे जन्मुनि ते पुनः पुनरपी मानेवरी वैसती ; येतां तो इतिहास तास जगणें जातें नको होउनी १०-२-२८ क-हाड. सायंकाळ घरदार सोडुनी होइ रवी परदेशी ! -हें सारें केवळ-एक तिच्यास्तव सारें ! परि हाय ! तरीहि न !-अखेर तो अस्तावे ! -मग रजनी राणी हृदय खुलें करूं लागे ! २६-१-३१ पुणें.