पान:अर्धचंद्र.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'R दिसून येतात. पुष्कळ वेळां त्यांची भाषा इतकी ओघवती, अनुरूप व अन्वर्थक असते कीं, एकादा कानामात्राही बदलण्यानें अर्थहानि होईल. “ अन् भूतकाल ज्या दिशेस गेला तिकडे... अन् म्हणे काळ हा पुढेच धावत राहे.” । 'रत्नराशी नव्हतीच त्या ठिकाणीं, येई भवती परि ‘ सहारा' दिसोनी.” ‘ मग हृदय तयानें आपुलें खुलें केलें, तों जगास झालें विश्वरूपदर्शन.”

  • एक सुधेचा बिंदु जिवाची शमवि जशी न तहान, एकच आशा किरण न सारी अंतरिंचें तम दूर.' ‘ असतेंच असें जर जग हें साधे-सुधे

तर कशास कविता लागति करण्या व्षरे इत्यादि ओळींवरून त्यांच्या भाषाशैलीची कल्पना येईल. परंतु त्यांनीं बरोबर शब्दयोजनेकडे थोडे दुर्लक्ष केलेलेंही कांहीं ठिकाणी आढळेल. किंबहुना ओठावर येईल तो शब्द वेष्ठीला धरण्याचा त्यांचा बाणा असावासें वाटते. त्याचप्रमाणे मराठीतील कांहीं शाब्दिक म्हणींवरून द्वचर्थी सुचलेल्या कल्पनांवर आधारलेली कविताही विशेष आकर्षक वाटत नाही. उदाहरणार्थ, 'गुण उधळण्यावरून 'सुचलेली कविता, किंवा नापासांनीं खाली राहणें, इत्यादि. मात्र कोणालाही न सुचणा-या कल्पना प्रत्येकाच्या हरघडी मुखावर नाचणा-या शब्दांवरून त्यांना कशा सुचतात हें आश्चर्य आहे. पण्डित सप्रे यांची कविता अत्यंत स्फुट स्वरूपाची असल्यामुळे तिला सुभाषितांचें स्वरूप येणारें आहे. त्यासाठी शब्दयोजना अत्यंत मार्मिक व वेचक होणें इष्ट आहे, म्हणून वरील वैगुण्याचा निर्देश केला. पण्डित सप्रे यांची बिनचूक मर्मभेद करण्यांत दिसून येणारी हातोटी, अंतःकरणांत न खुपतां जाऊन भिनणारा त्यांचा उपरोध, सहजासहजी कोणालाही फसवणारें त्यांचेंगांभीर्य, आणि शेकडों ओळींनी जें कार्य होणार नाही, तें चारदोन ओळींत बेमालूम रीतीनें करण्याचें त्यांचें कौशल्य,