पान:अर्धचंद्र.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

g यांमुळे त्यांनी आपली जागा, सरस्वतीच्या मंदिरांत, उच्च स्थानी अगदी स्वतंत्र अशी संपादन केली आहे. त्यांचा हा अर्धचन्द्र, हल्ली काव्याकाशांत मिणमिणणा-या पुष्कळ वाड्मयग्रहांना अस्तंगत करील व आपलें पूर्ण तेज चोहोंकडे लौकरच फांकील असा मला विश्वास वाटतो. धोक्याचे प्रसंगीं अज्ञ बालकांना ज्याप्रमाणें त्यांच्या इच्छेउलट घालवून द्यावें लागते, परंतु तेंच परिणामीं त्यांना हितकारक असतें, त्याचप्रमाणें पण्डितांचा हा अर्धचन्द्र समाजांतील अनेकांचे बाबतीत ठरेल. आशीर्वाद अगर शा यांचा त्यांच्यावर सारखाच परिणाम होणार हें जाणूनही अर्धचन्द्रानें पाडलेली साहित्यांतरिक्षांतील प्रभा उत्तरोत्तर वृद्विगत होवो असा त्यांना आशीर्वाद देऊन ही प्रस्तावना संपवितों. क्र-हाड : द. पां. पाठ६ 守T Sーヨーミく पा. पाठक्र