पान:अर्धचंद्र.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या ओळींवरून जगांत लफंगेपणामुळे जें दुःख माजलें आहे त्यामुळे कविहृदय पिळवटून जातें व त्यांतून काव्याचे तीव्र सूर निघतात, सवंत्र जर आरामीआराम असता तर कवीची हृदयवीणा छेडली गेली नसती असें ते ध्वनित करतात. काव्यनिष्पत्तीविषयीं अशाच प्रकारची मीमांसा अनेक विद्वानांनी केली आहे. देहभान विसरून जगाला मंत्रमूढ करणारे नितांतमधुर सूर, ज्यांत दुःखानें एकसारखी घरें पाडिली आहेत, मनोभंगपरंपरेनें लचके तोडल्यामुळे जें भग्न झालें आहे अशाच कविहृदयांतून बाहेर पडतात. समाधानाच्या शीतलावस्थेत जे मन गारगोटीप्रमाणे असतें त्यास दुःखाची प्रखर आंच लागल्यावर आंतील भावसुधा चुनकळीप्रमाणें उमलते. वज्रालाही वितळविणा-या रसरशीत भट्टीतूनच स्वर्णमयी सरस्वतीची तेजःपुंज मूति प्रगट होते. थोड्याशा धगीनें सामान्यजनांचीं मनें पाचोळयाप्रमाणें कर्पून जातात. पण थोरांची तावून सुलाखून निघतात. डांटे, कीट्स, शेले किंवा मॅक्सिम गॉर्की यांची उदाहरणें वरील सिद्धांताचीच सत्यता पटवतील. शब्द, कंप, उष्णता, प्रकाश ही जशीं निरनिराळी विद्युत्स्वरूपें आहेत तसेच कोमल हृत्कंप किंवा कल्पनेची उंच भरारी हे काव्यशक्तीचेच आविष्कार होत. भावनेशिवाय काव्य म्हणजे जलहीन सरोवराप्रमाणें होय. पण्डित सप्रे यांची कविता, कल्पनेच्या पंखावरून गगनविहार करण्यास अधिक उत्सुक दिसते. पण हें ध्यानांत ठेवलें पाहिजे कीं, सहज लीलेनें स्वर्गारोहण करणा-या त्यांच्या प्रतिभापुष्पकाला, जी प्रेरक शक्ति प्राप्त झाली आहे तिचा उगम, त्यांच्या हृदयांतील बाष्पीभूत भावबिंदूच्या वाफेमधूनच झालेला आहे. पेट्रोलच्या थेंवापासून तात्काल ठिणगी कशी उत्पन्न होते हें ज्यांनीं पाहिलें असेल त्यांना पण्डित सप्रे यांच्या कल्पनाशक्तीची यथार्थ जाणीव होईल. नाही तर भवशून्य कल्पनाविलास म्हणजे उडाणटप्पूचा रिकामटेकडा टारगटपणाच झाला असता. रुक्ष तर्कट कोणतेही अंत:करण रिझवू शकणार नाही. पण्डित सप्रे यांच्या कल्पनेची फॅक भावसमुद्रांतून निघाली आहे हें विसरतां कामा नये. क्षणक्ष ोिट पावणा-या minute गें उसळणा-य कल्पनेच्या शब्द बिचारे दुमते तिमाते N या त्यांच्या कवितेत ܓܕ