पान:अर्धचंद्र.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ उत्पन्न झालेली चीड जगाच्या अंतर्यामीचें पावित्र्य व मांगल्य पाहून खचित नाहींशी होईल. 'सांपडलेला आनंद' या कवितेंत जसे ते प्रथम फसून चिडतात पण पुढे सत्य प्रकार पाहून खुलतात तसाच जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोणही बदलेल, सृष्टिसुंदरीच्या कडेवर त्यांना जें आज भलतेंच ( किंवा भलत्याचेंच ) दिसत आहे, तें तसें खरोखर नाहीं असें आढळून येईल; व आपलेंच अपत्य तेथें प्रेमानें खेळत असलेलें पाहून त्यांचें कविमन संतुष्ट होईल असा भरंवसा वाटतो. विश्वाच्या गहन स्वरूपाविषयीं ओझरतेपणें प्रदशित केलेले त्यांचे विचार एकाद्या द्रष्टयाच्या (prophet) तोंडीं शोभण्यासारखे आहेत. 'लपंडाव' कवितेंत केलेली हल्लींच्या नास्तिक जगाची मीमांसा मोठी काव्यपूर्ण आहे. मानवाला लपलेला देव जरी सांपडला नाहीं तरी, देवाला मानव सांपडला म्हणजे पुष्कळ झालें; नाहीं तर कायमचीच चुकामूक व्हावयाची. आर्त किंवा दु:खित यांच्याशीं सहानुभूति हें जें कविहृदयाचें एकमेव लक्षण, तें त्यांच्या ' एक पापी' या कवितेंत स्पष्ट दिसतें. प्रेमाविषयीं बोकाळलेल्या स्वैर व शिथिल कल्पनांची त्यांनीं केलेली थट्टा त्यांच्या वरवर दिसणा-या प्रेमगीतांमधून सारखी वाहत आहे. प्रेमाचें पावित्र्य व एकनिष्ठता यांचें त्यांना किती महत्व वाटतें तें 'त्याचें हृदय' या कवितेवरून कळून येईल. ज्यांत कितीएक गोड पोरी आल्या नि गेल्या । तें हृदय कसलें-छे: असे धर्मशाळा ! यापेक्षां जोरदारपणें मला वाटतें, कोणीही आपला आशय प्रदशित करू शकणार नाही. मृत्यूनंतर होणा-या जीवशिवाच्या ऐक्याचा पोकळ वेदांती सिद्धांत किती सहजपणे 'भग्नदीपां'त सुचविला आहे ! मला ती कविता argi äŘoczHT Adomais Heft, Life is a many-coloured dome या पद्यपंक्तीचें स्मरण झालें. सहज जातां जातां काव्यविषयक कांहीं वादग्रस्त मुद्दे सूचित करण्याची त्यांना हौस दिसते. असतेंच असें जर जग हें साधेसुधे, तर कशास कविता लागति करण्या बरें ?