पान:अर्धचंद्र.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ース हैराण झाला आहे. पण्डित सप्रेसारखे अंद्रोक्लीज हेच खरे समाजसेवक होत. अन्नाविना तडफडणारा बुभुक्षित समाज वाटेल त्याची आहुति घेईल, पण अशा कवींच्या पायीं तो, कृतज्ञ लीनतेनें सदैव नम्रच राहील. आमच्या टिळक हायस्कूल’ त्रैमासिकांत प्रसिद्ध करण्यासाठी पण्डित सप्रे यांची कविता मीं जेव्हां प्रथम पाहिली तेव्हांच, हें पाणी कांहीं निराळे दिसतें, अशी खूणगांठ मनाशीं बांधली. त्यांची कविता पाहून कै. दिवाकर यांची मला आठवण होते. दोघांचीही दृष्टि सारखीच भेदक आणि काव्यांगणांत प्रवेश करण्याचा दोघांचा मोहराही सारखाच दहशत उत्पन्न करणारा. मायावी जगानें पांघरलेलें सिंहाचें कातडे ओढून फाडून टाकण्यास दोघेही सारखेच उत्सुक. नाटयछटाकार दिवाकर याच उद्योगांत अखेरपर्यंत गढून राहिले. जगाच्या ढोंगीपणाला विटलेलें त्यांचें मन असंतोषांतच विराम पावले. पण्डित सप्रे यांच्यांत हा कडवटपणा जरी भरलेला दिसतो, तरी त्यांचें हृदय जगद्वेषानें पूर्ण पछाडलेलें दिसत नाही. या अर्धचन्द्राचा शेवट ' विगतप्राण सारमेयास' या कवितेनें त्यांनीं केला आहे खरा, पण थोडे खोल पाहतां त्याच कवितेवरून सिहाचें खोटें कातडे पांघरलेले कुत्रे मेलें, आतां खरें तेजस्वी जग आपल्या स्वतःच्या स्वरूपांत चमकू लागेल अशी आशा ध्वनित केलेली दिसेल. 'बाल सारमेयास', 'सागरगोटे' किंवा जगासंबंधींच्या तीन कविता यांमधून जगाच्या सांप्रतच्या स्वरूपाविषयी त्यांना वाटत असलेली निराशा स्पष्ट दिसते. आपण या जगाचे रहिवाशी नसून, चुकलेल्या फकिरांप्रमाणें उपरे आहोत, ही जडवादविरोधी कल्पना, जगावर मशिदीचें सुंदर रूपक करून त्यांनीं पुढें मांडली आहे. शहरांतील 'संगीत शाळेतून' ऐकू येणा-या कर्णकर्कश गागाटावरून, या जगाला संगीत समजणा-यांची जुळतो न कुणाचा कुणास येथें सूर ܓ पिणयांच बतकलदांनी चांगलीच संभावना केली आहे. तरीं या कवितांमध्ये 蠶蠶 नाही. 'वळीव' व ਰ म्हणण्याची साक्ष देईल. सीीि रंगेल भावमाधुरी वरील tणाच्या बाहय स्वरूपाकडे पाहून ।