Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पापड, लोणची, खाकरे यासारखे देशी टिकाऊ पदार्थ; इडली, डोसे असे पदार्थ झटकन घरच्याघरी तयार करता यावेत यासाठी लागणारी पिठे; ढोकळे, वडे असे तयार पदार्थ यांची मोठी गर्दी उसळली आहे. जॅम, सॉस ही विलायती तोंडवळ्याची टिकाऊ मंडळी, केक-पुडींग करण्याकरता लागणारे साहित्य आणि पिझ्झा, आईस्क्रीम यासारखे खाद्यपदार्थ त्यांच्याबरोबर मोठ्या दिमाखाने कोणत्याही ठिकाणी उभे दिसतात.
 शहरी गृहिणींची खाद्यप्रक्रिया
 माजघर शेतीचा कार्यक्रम संघटनेने जाहीर केला त्यामुळे काही ठिकाणी शेतकरी स्त्रियांनी कुरडया, पापड्या, शेवयांपासून थालीपीठ, चकल्या यांना लागणाऱ्या भाजण्या वगैरे वस्तू बाजारात आणल्या; पण या क्षेत्रातही शहरी महिलांनी जास्त आघाडी मारली. पदार्थ खरेदी करणारा ग्राहकवर्ग प्रामुख्याने शहरी; त्याच्या चव, रुची, गंध, स्वाद यांबद्दलच्या आवडी-निवडी शहरातील महिलांना अधिक चांगल्या माहीत. गावात ठेवणीचे पदार्थ करायचे म्हटले तरी उरलासुरला, पडका माल वापरला जातो. बाजारात जे बटाटे पाठवता येत नाहीत त्यांचा आम्ही कीस करतो. ती गोष्ट कैऱ्यांना लागू, लिंबांनाही व सर्वच भाज्या-फळांना. मुद्दाम चांगले पदार्थ घ्यावेत, ते केवळ टिकावे एवढ्याचकरिता नव्हेत, तर खमंग, स्वादिष्ट असावेत व आकर्षक दिसावेत याकरिता शहरी गृहिणी अखंड प्रयत्नात असतात. तयार खाद्यवस्तूंची बाजारपेठ शेतकरी महिलेपेक्षा शहरातील गृहिणीने ताब्यात घेतली हे याचे एक कारण.
 अन्न-प्रक्रियेकडे ओढा

 यापलीकडे शेतीमालाच्या प्रक्रियेच्या व्यवसायात प्रवेश करू पाहणारा असा एक नवा समाज पुढे येत आहे. यातील बहुतेक मंडळी वयाने तरुण म्हणजे चाळिशीच्या आतील. गाठीशी फारसा पैसा नाही. प्रत्येकाच्या गाठीस एखादी पदविका किंवा पदवी. क्वचित प्रसंगी अभियांत्रिकी, रासायनिक किंवा अन्नप्रक्रियेच्या क्षेत्रातील. फार उच्च गुणांनी पदवी मिळवलेले या मंडळीत क्वचित आढळतात. बहुतेकांचा शेतीशी काही लागाबांधा आहे; पण शेतीचे दरवाजे त्यांना अनेक कारणांनी बंद झाले आहेत. शिकल्या-सवरल्यानंतर शहरातून गावी परत जाणे अनेक अर्थांनी कठीण असते. आहे त्या शेतीत जाऊन उदरनिर्वाहाची सोय कठीण, उलट आधीच असह्य भार झालेल्या जमिनीवर नवा अवघड भार वाढल्यासारखी स्थिती होते. नोकरीचे दरवाजे जवळजवळ बंद झालेले. म्हणजे स्पर्धा करून नोकरी मिळवण्याची फारशी कुवत नाही. चांगली बँकेतली, सरकारी

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ५४