पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
माझे युवा विश्व


 युवापिढीसोबत सतत येणारा संपर्क, किंबहुना दररोज पाच ते सहा तासांची तोंडओळख होत असल्याने तरुणांची जमेची बाजू आणि कमकुवत बाजू समजून घेण्यास मदत होते. हळुहळू युवकांचा कल स्वःताचे स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार करण्याकडे वळतो आहे. ही जमेची बाजू असून त्यानुसार प्रयत्नही चालू झाले आहेत. स्वयंओळख, स्वतःच्या सादरीकरणासाठी कोणतीतरी धडपड चालूच असते. युवारंग अधिक गडद होताना शासनाच्या योजनाची त्यात भर पडते. आपल्या देशाचा तर उल्लेख केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण ६४ टक्के लोकसंख्या तरुण आहे. आणि त्यांची तरुणाई हातात असलेल्या नाहीतर अडकलेल्या मोबाईलसोबत जोडली आहे. असे फक्त युवा/तरुणच करतात, असे नाही तर लहान-मोठ्यांची सवय काही वेगळी नाही. तरुणपिढी फक्त त्यातच गुरफटलेली नसावी. ह्या तंत्रज्ञानाचे किती चांगले आणि किती घातक परिणाम व्हायचे आहेत, किंवा असू शकतात ह्यावर पुरेसे संशोधन व्हायचे आहे. तेव्हा जरा जपून असेच म्हणायची वेळ आली आहे.
 मी आणि माझे विश्व म्हणजे मोबाईल ही संकल्पना थोडी बदलायला पाहिजे. असे झाले नाही तर स्वतःची ओळख, अस्तित्व आणि व्यक्तिमत्वात

LODDE BA न HIBGuys Bes UNT Male

Photo source: ied.eu.com

अर्थाच्या अवती-भवती । ९८