पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बदल होईल. एक अडकून राहणारी व्यक्ती बनता कामा नये. विविध क्षेत्रात वावरणारे व्यक्तिमत्व अधिक महत्त्वाचे आहे.
 मोबाईलचा मर्यादित वापर, कामापुरता उपयोग, इतर गरज, आवडी- निवडीकडे लोकांना नेईल. वाचन ही तशी कमी झालेली सवय ही मोबाईल वाचनामध्ये परावर्तित झाल्याचे दिसून येते. आवडीच्या लेखकांची पुस्तके, साहित्य, चांगले लेख आम्ही वाचत नाही, असे शिक्षित वर्ग सातत्याने म्हणत असतो. कारण, २-३ तास तरी मोबाईलचे व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर खर्च होत असतात. सतत संगणक वापरामुळे शरिरावर परिणाम दिसायला लागतात. पाठ, कंबरदुखी, डोळे व हातदुखी आदी विकार हे जुन्यापिढीपेक्षा नव्या पिढीत अधिक प्रमाणात दिसत आहेत.

 काही वेळ नेटवर्क, वायफाय किंवा संबंधित सोय बंद पडली तर अधिकांश लोकांना बैचेन होते. त्यावेळेत ते स्वतःचा किंवा संबंधित लोकांचा किंवा कामांचा शांतपणे विचार करु शकतात. काहीवेळ ही टेक्नॉलॉजी दर आहे असे पाहून बरे वाटते. आता असे सांगणारे तरुण वाढत आहेत. हा बदल सावकाश होतोय, मात्र चांगला आहे. नाहीतर सर्वजण घरात आहेत, माज्ञ कोणी कोणाशी संवाद साधत नाहीत. कारण प्रत्येकाचे डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर आहेत. त्यातून बाहेर पडा आणि मानसांत या, अशी सांगण्याची वेळ आलेली आहे. सर्वांनी आपापल्या परिने चिंतन करण्याची गरज आहे.


Photo source : www.freepng.com

अर्थाच्या अवती-भवती । ९९