पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नायजेरिया आणि सीरियामध्ये कमी काळाकरिता गहाण शेती केली जाते. या क्षेत्रांमध्ये जमिनीची धूप वाढली आहे. तसेच जलस्तर कमी होणे, वनीकरण कमी होणे इत्यादी परिणाम दिसतात.
 २०३० साली शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा दुप्पट होणार असे दिसते. सध्यातरी अल्पविकसित देशांमध्ये ग्रामीण लोकसंख्या अधिक आहे. या देशांमध्ये शहरांची संख्या १६० टक्के वाढेल. २००० सालापर्यंत जगातील प्रमुख २१ शहरांमध्ये १० मिलियनपेक्षा अधिक लोक निवास करतील. या २१ पैकी १७ शहरे विकसनशील देशातील राहतील. २०१५ पर्यंत आशियाची ग्रामीण लोकसंख्या सतत वाढण्याची शक्यता आहे. युरोपातील देश व जुन्या सोव्हियट संघात ग्रामीण लोकसंख्या आताच घटली आहे. तसेच दक्षिण अमेरिकेत शहरीकरण तीव्र वेगाने वाढत आहे. तीव्र वाढणारे शहरीकरण आणि स्वच्छ पाण्याची कमतरता, उद्योगांचे प्रदूषण व वाहतुकीचे प्रदूषण इत्यादी वाढत असल्याने पर्यावरण स्वच्छंद आहे. त्याचा प्रभाव ग्रामीण पर्यावरणावर पडल्याशिवाय राहणार नाही. यात गरीब शेतकऱ्याला सर्वाधिक धोका निर्माण होईल. एक योजनाबद्ध शहरीकरणाची रूपरेषा आखल्यास असे दुष्परिणाम काही प्रमाणात थांबविता येतील.
लोकसंख्या नियंत्रणासाठी धोरण :
 जागतिक स्तरावर फक्त जन्मदर कमी करून होणार नाही तर प्रत्येक देशात चारी बाजूंनी विचार करणे आवश्यक आहे. ग्रामीण कुटुंबाची उत्पन्नपातळी वाढायला हवी. बालमृत्यू दर कमी व्हायला हवा. शैक्षणिक व रोजगार स्तरांमध्ये विस्तार करून स्त्रियांच्या संदर्भात विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबनियोजन कार्यक्रमात वाढ अत्यंत आवश्यक आहे.
 स्त्रियांच्या शैक्षणिक स्तरात वाढ करणे व त्यावरील गुंतवणूक दीर्घकाळात निश्चित उत्तम प्रतिसाद देईल. कारण अल्पविकसित देशांमध्ये स्त्रियांचे फक्त अल्पशिक्षण प्रायमरीपर्यंत प्राप्त केले असेल तर त्यामध्ये ५-७ मुले असलेली आढळतात. हे प्रमाण १९९० सालापर्यंत मोठ्या स्वरुपात आढळत होते. अधिक व उच्च स्तरापर्यंत शिकलेल्या स्त्रीया एक किंवा दोन मुलांचे उत्तम पोषण करण्यावर अधिक भर देतात. म्हणून शाळा, प्राध्यापक व त्या संबधित साहित्यावर भर देणे आणि गुंतवणूक करणे आवश्यक आहे. विद्यार्थांना प्रोत्साहित करणे व शाळांमध्ये जायला शिकवणे, त्यांना शिष्यवृत्ती देणे इत्यादी धोरण स्विकारल्यास या समस्येकडे सर्वोच्च लक्ष वेधता येईल. बांग्लादेशात शिष्यवृत्तीच्या कार्यक्रमामुळे स्त्रीशिक्षण दुप्पट झालेले आढळते.

 परिणामत: असे कार्यक्रम कमी जन्मदर, उशीरा विवाह आणि स्त्रियांची

अर्थाच्या अवती-भवती । ९५