पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाल्या आणि मागच्या चार दशकांमध्ये त्यांनी गंभीर रूप घेतले. अतिशय कमी दर्जाच्या सोयी उपलब्ध करून दिल्याने आर्थिक बाबींचा नीट विचार न केल्याने भूमीतील -हास व निर्वनीकरणाने जोर पकडला. त्याने कमी उत्पादकता झाली. आफ्रिकेतील वने १९८० साली आठ टक्क्यांनी कमी झाली आणि ४० टक्के भागांना हानी पोहोचली. असे प्रमुख आफ्रिकी देश होते. बुरुंडी केनिया, लिसोस्थो, लिबेरिया, मुऊरिया आणि खांडा येथे भूमितील सुपीकता बरीच कमी झाली.
 असा देखील अंदाज लावण्यात येत आहे की, जगातील ९०% लोकसंख्या शहरी क्षेत्रामध्ये वाढेल; पण आफ्रिकेचा सहारा प्रदेश, मध्य-पूर्व व उत्तर आफ्रिका, मध्य अमेरिकेची ग्रामीण लोकसंख्या वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. शहरीकरणामुळे ग्रामीण पर्यावरणावरील बोजा कमी होईल. परंतु, दुसरे भयंकर स्वरूप शहरात विकसित होतील. जसे औद्योगिक विकासामुळे प्रदूषण व दूषित वातावरण वाढेल.
 या समस्येकरिता एक महत्त्वाचा उपाय मार्ग सांगायचा झाल्यास वाढत्या लोकसंख्येबरोबर मानवीय कुशलतेत वाढ करणे, उत्पादकता वाढविणे आणि त्याबरोबर उत्पन्नातील वाढ सातत्याने होऊ शकेल याचा प्रयत्न करणे असा सूचविता येईल. गंभीर रूप धारण केलेल्या आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेकरिता एक उपाय मार्ग असा की, स्त्री शिक्षणात वाढ केल्याने तेथील दीर्घकालीन पर्यावरणनीती यशस्वी होऊ शकेल. तसेच हे इतर विकसनशील देशांकरितादेखील लागू होईल. साक्षरता वाढविणे हा निश्चितच जन्मदर कमी करण्याचा एक यशस्वी मार्ग आहे. अनेक संशोधनावरून स्पष्ट होत आहे की, माध्यमिक वर्गापर्यंत शिकलेल्या स्त्रीचे लक्ष या समस्येकडे वळल्याने मुलांची संख्या सात ते तीनपर्यंत कमी झालेली दिसते. कुटुंब नियोजनाच्या सोई वाढविल्यास त्यात अधिक घट साधता येईल. विकसनशील देशांमध्ये कुटुंब नियोजन पद्धतीचा वापर करणारे आता १९९२ सालापर्यंतचे प्रमाण ४९ झाले आहे. आणि हे प्रमाण १९८० साली ४०% होते. सन २००० पर्यंत हा दर ५६% होण्याची शक्यता आहे. २०१० पर्यत ६१%. परंतु, याकरिता मोठ्या खर्चाची तरतूद करावी लागेल. ती दर वर्षी ८ बिलियन तरी वाढवावी लागेल. तेव्हाच हे कार्यक्रम यशस्वी होतील.

दीर्घकालीन विकास

जागतिक बँकेच्या प्रकल्पानुसार एकूण जागतिक लोकसंख्येची वाढ १९९० सालापासून १.७ टक्के दरवर्षी या दराने कमी होत आहे. आणि २०३० पर्यंत

अर्थाच्या अवती-भवती । ९३