पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोकसंख्येचे महत्त्व आणि दारिद्र्यासंबंधी कार्यक्रम
 जागतिक लोकसंख्येतील दर वर्षातील वाढ १.७ टक्क्यांनी होत आहे. १९६० सालच्या दराशी याची तुलना केल्यास हा दर कमी झालेला आहे हे नक्कीच. कारण, १९६० मध्ये हा दर २.१ टक्के होता. शंभर वर्षांच्या कालावधीत निरपेक्ष वाढ इतकी अधिक कधीच नव्हती. १९९० ते २०३० पर्यंत जागतिक लोकसंख्या ३.७ बिलियन वाढण्याची शक्यता आहे. या आकड्याचा ९० टक्के भाग अल्पविकसित देशांमध्ये असेल. पुढील चार दशकांमध्ये आफ्रिकेतील लोकसंख्या पाचशे मिलियन ते १.५ बिलियन वाढेल. असेच आशियाची ३.१ बिलियन ते ५.१ बिलियन वाढेल व लॅटिन अमेरिकेची ४५० मिलियन ते ७५० मिलियन इतकी वाढेल.
 तीव्र वेगाने वाढणारी लोकसंख्या नेहमीच पर्यावरणाला नष्ट करत असते. परंपरागत जमीन व संसाधन व्यवस्थापन पद्धती भूमी संसाधनांच्या अधिक वापराला थांबवू शकत नाही. त्या सरकारलादेखील संसाधनांचा विकास व मानवीय गरजांना पूर्ण करणे अशक्य असते. वरील नमूद केल्याप्रमाणे घनतेचा विचार केल्यास जितकी घनता अधिक असेल तितका पर्यावरणाला धोका निर्माण होईल. आज त्याला काही देशांचे उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. बांग्लादेश, रिपब्लिक ऑफ कोरिया, नेदरलँड, जावाद्वीप, इंडोनेशिया येथे ४०० किलोमीटर लोकसंख्येची घनता आहे. पुढील शतकाच्या मध्यकाळामध्ये एक तृतीयांश लोकसंख्या अशा घनतेच्या चक्रात सापडणार आहे. असा अंदाज द्यायला हरकत नाही की, संपूर्ण दक्षिण आशिया अशा घनतेखाली येईल. बांग्लादेशाची घनता १,७०० दर वर्ग किलोमीटर असेल आणि असाच परिणाम आफ्रिकेतील देश फिलिपिन्स आणि वियतनाममध्ये देखील दिसतील.
 तीव्र वेगाने वाढणारी लोकसंख्या दारिद्र्यामध्ये भर टाकून पर्यावरणाला हानी पोचविते म्हणून गरीब लोक पर्यावरणाच्या हानी चे कारक ठरतात व वाईट परिणाम भोगतात. कारण, संसाधने व तंत्रज्ञानाच्या अभावी त्यांचा विकास होत नाही. शेतकऱ्यांची भूमीची भूक पूर्ण न झाल्याने ते डोंगरावरील शतीग्रस्त झालेल्या भूमीला निवडतात. त्याशिवाय त्यांना इतर पर्याय राहत नाही. तसेच उत्तम जमिनीचा क्षय होऊ लागतो. गरीब कुटुंबे आपल्या आवश्य गरजांना भागविण्याकरिता वृक्षांना कापतात. त्याने जमिनीची धूप अधिकच वाढते.

 आफ्रिकेच्या सहारा भागातील कृषीतील आलेल्या अस्थिरतेचे प्रमुख कारण वाढती गरिबी, लोकसंख्येतील वाढ आणि पर्यावरणाचा -हास असे आहे. हळूहळू वाढत आलेल्या या समस्या तीव्र वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे निर्माण

अर्थाच्या अवती-भवती । ९२