पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करत असतो. त्यातूनच राष्ट्राची प्रगती होऊ शकते. अशी अनेक उदाहरणे आपल्याला जगात सापडतात. ज्यांना प्रतिकूल परिस्थितीत राहावे लागले तरीदेखील त्या राष्ट्राची प्रगती अतिशय समाधानकारक झाली. जसे जपान, कोरिया, इस्राईल, चीन इत्यादी देशांनी केलेली प्रगती केवळ मानवी प्रयत्नामुळे झालेली आहे. यामुळे केवळ राष्ट्रातील लोकसंख्या कमी किंवा जास्त हे राष्ट्रविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून त्या राष्ट्रातील लोकसंख्येची गुणवत्ता महत्त्वाची असते. असे कुशल मानव पर्यावरण सुरक्षित ठेवण्याकरिता नैसर्गिक साधनसंपत्तीचा कसा वापर करायचा याची काळजी घेऊ शकतात. दुर्दैवाने या जगात असे सर्वत्र घडले नाही म्हणून पर्यावरणातील संबंधित समस्या आणि प्रामुख्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. काम करणारी लोकसंख्या ती त्या देशाची प्रमुख मुख्य साधन संपत्ती ठरते. परंतु, गुणवत्ता नसलेली लोकसंख्या जास्त असल्यास ती त्या देशाकरिता एक समस्या ठरते. असे देश सर्वच दृष्टीने प्रामुख्याने आर्थिक व सामाजिक मागासलेले असतात. त्याचा संपूर्ण पर्यावरणावर वाईट परिणाम पडतो. आपल्या देशाची साधनसंपत्ती जपून ठेवण्याची समज नसल्यास त्याचा गैरवापर तरी होतो किंवा ती संपत्ती अज्ञानामुळे वाया जाऊ शकते. जसे जंगलतोड, वन्यप्राण्यांचा नाश, महत्त्वपूर्ण खनिजांचा योग्य वापर माहीत नसणे इत्यादी.

लोकसंख्येचे वितरण
 प्राकृतिक रचना, हवामान, जलसंपत्ती, मृदा, खनिजसंपत्ती इत्यादी घटकांवर लोकसंख्येचे वितरण व लोकसंख्येची घनता अवलंबून असते. याशिवाय हे ऐतिहासिक व सांस्कृतिक घटकही लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात.
 पृथ्वीवर लोकसंख्येचे वितरण असमान झालेले आहे. प्रदेशाचे क्षेत्रफळ विचारात घेऊन लोकसंख्या कुठे जास्त किंवा कमी आहे हे स्पष्ट करता येते. भूमी व मानव यांचे गुणोत्तर काढून प्रदेशातील लोकसंख्येचे वितरण स्पष्ट केले जाते. नैसर्गिक पर्यावरणाचा व लोकसंख्येच्या घनतेचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. हवामान व मृदा घटकांची अनुकूलता असलेल्या प्रदेशात लोकसंख्या जास्त प्रमाणात केंद्रीत झालेली आढळते. उत्तर अमेरिकेत फक्त बारा इतकी घनता आहे, तर दक्षिण अमेरिकेत २६ इतकी आहे. आफ्रिकेत लोकसंख्येची घनता २२ असून आशियात १०१ इतकी आहे. रशिया वगळून युरोपमध्ये ९.९ इतकी घनता आहे. भारतातील लोकसंख्येची घनता २५८ आहे.

 लोकसंख्येचा आढावा घेतल्यास जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे २३ टक्के

अर्थाच्या अवती-भवती । ९०