पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लोकसंख्या : एक साधनसंपत्ती व पर्यावरण


 पर्यावरणातील जैविक घटकांपैकी मानव हा अत्यंत प्रभावी घटक असून मानव केवळ जैविक घटकांतच नव्हे तर अजैविक घटकातही परिवर्तन घडवून आणतो. तसेच सर्व जैविक व अजैविक घटकांचाही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रभाव मानवावर होत असतो. मानवी साधनसंपत्ती ही जगात सर्वात महत्त्वपूर्ण साधनसंपत्ती मानली जाते. कोणत्याही कार्यासाठी (आर्थिक किंवा अनार्थिक) श्रमशक्ती यादृष्टीने मानव अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीत मानव हा विशेष साधनसंपत्तीचा घटक म्हणून ओळखला जातो. मानवात स्वतः साधनसंपत्ती निर्माण करण्याची शक्ती व क्षमता असते. मानव आपल्या ज्ञानाने, बुद्धिमत्तेने, कल्पकतेने व कौशल्याने नैसर्गिक साधनसंपत्तीचे विदोहन करतो व स्वतःच्या सुखसोयींसाठी त्यांचा उपयोग करून घेतो. अर्थातच लोकसंख्या वाढल्यास व मानवाने आधुनिकीकरणाकडे झुकल्यास नैसर्गिक साधनसंपत्तीचे मानवाच्या सुखसोयी करिता अधिक विदोहन होऊन किंबहुना त्याचा वापर वाजवीपेक्षा जास्त होण्याची शक्यता असते.
 साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे हे महत्त्वाचे आहे. कारण, मानवाच्या योगदानामुळे संपूर्ण जगातील विकास होऊ शकला. फक्त त्याचा दुरुपयोग व्हायला नको. महत्त्वकांक्षी व कार्यक्षम मानव या दृष्टीने विचार करून वापर

Photo source : wionews.com

अर्थाच्या अवती-भवती । ८९