पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणे कठीण जात असते. जर इलेक्ट्रॉनिक सांख्यिकी माहिती पुरविल्यास काही समस्या दूर करता येतील. जहाजी कंपन्यांची थोडक्यात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक वाढविण्यास मदत करणे आवश्यक आहे आणि व्यापार तुलनात्मक परिव्ययाच्या आधारे चालू शकेल.
 खाजगी विमान वाहतुकीत १९९४ सालापासून बरेच बदल घडून आले आहेत. त्यांनी ४० टक्के क्षेत्र काबीज केले आहे. त्यांच्या सेवेतही बरीच वाढ झाली आहे. त्यांच्याकरिता मांडलेल्या नीतीला open skies असे म्हणतात. त्या वाहतुकीच्या किंमती कमी झाल्यास ती वाहतूक व्यवस्था ३० टक्के वाढण्याची शक्यता असते. किंमती तशाच कमी होतच आहेत. या क्षेत्रात झालेले शिथिलीकरण व तांत्रिक आणि आर्थिक पद्धतींना लक्षात घेतल्यास याला वेगळे स्वरूप देणे आवश्यक आहे.
 खाजगी गुंतवणुकीचा ओघ आता स्थिर वाहतूक संपत्तीकडे वळविण्याचा प्रयत्न चालू आहे. जागतिक बँक भारतीय बंदराकडे अधिक लक्ष वेधत आहे. सध्या तरी अशी भारतीय संपत्ती कमी उत्पादकता देऊ शकते आणि क्षमता पण अपर्याप्त आहे. ग्रीनफिल्ड पोर्ट व कार्गोची तंत्रपद्धती इत्यादी क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला वाव आहे. बंदराच्या रचनात्मक योजनेकरिता व्हिजन-२०२० नावाचे अभ्यास मंडळ स्थापले आहे.
 नवीन क्रायोजनिक टर्मिनल्स व पेट्रोल पदार्थांसंबंधी कार्य खाजगी भांडवलाद्वारे केले जाते. मुंबईची बंदरे या कार्यात यशस्वी झाली आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि विशाखापट्टणम बंदर कंटेनरची वाढ करण्यात यशस्वी झाले आहेत. अधिकांश बंदरे फार मोठे प्रकल्प असून प्रत्येकी अमेरिकन दोन बिलियन डॉलरचा खर्च येणार आहे. त्यामुळे हे खाजगी गुंतवणुकीमुळे असे करणे शक्य आहे. इलेक्ट्रिक रेल्वे लाईन आणणे, BOLT प्रकल्प जसे जर्मनीत आहेत तसे आणल्या जात आहेत. CONCOR आणि BOLT प्रकल्प ग्राहकांच्या गरजेनुसार या क्षेत्रात नूतनीकरण करणार आहेत. लोकोमोटिव्ह, रोलींग स्टॉकचेही खाजगीकरण होणार आहे. त्याकरिता आवश्यक असलेले तंत्रज्ञान आणले जात आहे.

दूरसंचार व्यवस्था :

 आधारभूत दूरसंचार सेवा दरवर्षी १७ टक्क्यांनी वाढत आहे. असे मागील चार वर्षांपासून होत आहे. दूरसंचार नीतीमध्ये खाजगी क्षेत्र तर आहेच आणि त्यात विदेशी गुंतवणूक ४९ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे कार्य दूरसंचार विभागाने (DOT) केले आहे. मूलभूत दूरसंचार सेवा, सेल्युलर फोन, पेजिंग, वर्धित मूल्य

अर्थाच्या अवती-भवती । ८६