पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महामार्गाचा एक हिस्सा खाजगी गुंतवणूक लावून पूर्ण करू शकतो. त्या खाजगी व्यक्ती किंवा समूहाला त्या निर्माण केलेल्या महामार्गावरील शुल्क स्वतः गोळा करता येईल. ट्रॅफिक नियंत्रण करता येईल. कायदा न मानणाऱ्या व्यक्तीला दंडित करता येईल. रस्ते निर्माणात मोठ्या पुलांची निर्मिती, रेल्वे उड्डाणपूल, शहरी बायपास इत्यादी खाजगी गुंतवणूक असून त्यात एकाधिकार गाजवता येईल. या कामात केंद्रस्तरावर MOST आणि NHAI आता लागलेले आहेत. आता भारतात उत्तम रस्ते निर्मितीला प्राधान्य मिळाले आहे. त्यामुळे चांगली अभियांत्रिकी सेवा, व्यवस्थापन व तंत्रज्ञान या क्षेत्रात देण्याच्या आवश्यकतेवर भर दिला जात आहे. जर एका खाजगी गुंतवणूकदाराने स्वखर्चाने १३ हजार किलोमीटरचा रस्ता बांधल्यास त्याला पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल, असे NHAIने स्पष्ट केले आहे.

वायु वाहतूक:
 दी एअरपोर्ट ऑफ इंडिया (AAI) १९९५ एप्रिल रोजी स्थापित झाली. असे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट अथोरिटी व राष्ट्रीय एअरपोर्ट अ‍ॅथोरिटीचे एकत्रीकरण आहे. आंतरराष्ट्रीय पातळी गाठण्याकरिता, विस्तारित सेवा देण्याकरिता व आधुनिकीकरण करण्याकरिता असे निर्णय घेण्यात आले आहेत. ही प्रगती अर्थातच विकेंद्रीकरण आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने होऊ शकणार आहे. नवीन विमानतळांच्या निर्मितीकरिता खाजगी क्षेत्रांनी दिलेल्या सहकार्याला प्राधान्यता दिली जात आहे. बेंगलोर, कालीकट, गोवा येथील विमानतळाकरिता कार्य सुरू झाले आहेत.

रेल्वे वाहतूक :
 खाजगिकरणापासून रेल्वे वाहतुकीला दूर ठेवता येत नाही. १९९४ सालापासून सरकार या क्षेत्रातही खाजगी गुंतवणुकीला वाव देत आहे. ही गुंतवणूक स्थिर व गतिशील रेल्वे संपत्तीकरिता केली जाईल व याकरिता BOLT-बिल्ड ओन-लिझ-ट्रान्सफर अशी योजना सुरू केली आहे.

 जागतिक बँकेचे सर्वेक्षणकर्ता व जागतिकीकरणाचे पुरस्कर्ते कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CONCOR)आणि भारतीय रेल्वेवर बरीच टीका करताना म्हणतात की, या दोन्ही क्षेत्रामध्ये योग्य सहकार्य नाही व यात कार्य करणारे कार्यक्षम अधिकारी नाहीत. आपल्या देशातील कंटेनर लाइन जी पर्शियन गल्फ अमेरिकीन बंदरे व युरोपबरोबर जोडलेली आहेत. ती ठराविक दिवस व आठवड्यापुरतीच असतात. त्यामुळे भारतीय जहाजांना विदेशी मागणीनुसार मालाचा पुरवठा

अर्थाच्या अवती-भवती । ८५