पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

mv किंवा पेक्षा जास्त अधिक शक्तीचे असतील. ते एकापेक्षा अधिक राज्याला विद्युत पुरवठा करू शकतील. कोळसा खाणीजवळच विद्युतशक्तीचे असे केंद्र उघडता येईल. हे कार्य पॉवरग्रीड या नावाखाली चालविले जाईल. त्याचे पूर्ण नाव पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे. एन.टी.पी.सी. सुद्धा असे सर्वेक्षण करून विविध बाबींना लक्षात घेणार आहे. जसे, योग्य जागा, जमिनीचे परीक्षण, पर्यावरणासंबंधी माहिती व सामाजिक आर्थिक अभ्यास इत्यादी. मोठ्या प्रकल्पांचे कार्य सध्या सरकारच बघणार आहे. खासगी गुंतवणूकदारांचे समाधान होईपर्यंत ही प्रक्रिया चालू ठेवण्यात येईल. येणाऱ्या भविष्यात बघावे लागेल की, एनटीपीसीची भूमिका काय असेल आणि विकसनशील कोळसा खाणीमध्ये किती गुंतवणूक होऊ शकेल. हे तेवढेच महत्त्वाचे कार्य आहे. या कार्याकरिता उत्तम दर्जाचे मार्गदर्शन लागेल.
 नवीन प्रकल्पाकरिता मर्यादित स्वरूपात स्पर्धा खुली करण्यात येईल. जरी केंद्र व राज्य सरकार यांचे नियंत्रण या खाजगी विद्युतशक्ती प्रकल्पावर असले तरी भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्पर्धेची कमतरता दूर करण्याकरिता हा एक प्रयत्न आहे. स्पर्धा खुली करण्याकरिता फार काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. या कामाकरिता दिलेल्या सूचनांमध्ये सुधारणा करण्याकरिता पाऊल उचलणे आवश्यक आहे. कारण, वीजपुरवठा किती प्रमाणात होईल, प्रती एकक किती किंमत वाढविता येईल किंवा त्याची सीमा काय असेल, विदेशी व देशी स्तरावर या क्षेत्रात आलेल्या स्फूर्तीमुळे काय प्रभाव पडेल, अशा सर्व बाबींचा विचार होण्याची आवश्यकता आहे. तरी खुला बाजार असला की, किंमत त्या बाजाराप्रमाणे ठरवावी लागते.

खाजगी क्षेत्राचा वितरणात सहभाग
 खाजगी क्षेत्रांचे अनुभव, कौशल्य व वित्तीय व्यवस्था विद्युत वितरणाकरिता अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच भारतात कुशलतेने त्यांनी कार्य होईल व उपयोग वाढू शकेल. या व्यवस्थेचे व्यापारीकरण होईल हे मात्र तेवढेच खरे. कारण, वितरणाकरिता काही कंपन्या, एजंट लावावे लागतील. तसेच काही करार करावे लागतील व परवाने द्यावे लागतील. खाजगी क्षेत्र अशाप्रकारे वितरण करेल की, त्यांना दीर्घकालीन नफा व्हायला हवा. असे सर्व त्यांना करता येत असेल तरच त्यांना या क्षेत्रात काम करण्यास उत्साह वाटेल.

 वितरण व्यवस्था चोख राबविण्याकरिता नियोजनबद्ध कार्य करण्याची गरज पडेल. अशा व्यापक स्पर्धेला विचारात घेताना कामाचा व्याप लक्षात घेणे आवश्यक आहे. जसे आकड्यांचे संकलन करणे, संशोधन करणे इत्यादी

अर्थाच्या अवती-भवती । ८३