पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आठवी योजना
 आपल्या देशातील बृहद औद्योगिक पुनर्रचना करण्याकरिता उद्योगांचे आधुनिकीकरण करणे, स्पर्धेत त्यांना आणणे व तांत्रिक बदल करणे हे तर महत्त्वाचे आहेच. त्यापेक्षाही उद्योगांचा वृद्धीदर जास्त करून साधारण व्यक्तीला या वृद्धीदराचा फायदा करून देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. या योजनेत सहा टक्के वृद्धीदर औद्योगिकरणाचा असावा आणि संसाधनांमध्ये गतिशीलता वाढावी याला महत्त्व देण्यात येईल. त्याकरिता उत्पादकतेत सुधारणा, क्षमतांचा योग्य वापर, संरचनात्मक सोई उपलब्ध केल्यास या दराला साध्य करता येईल. त्याकरिता आर्थिक सहाय्य कोणकोणत्या क्षेत्राला द्यावे, हे निश्चित करायला हवे. तसेच उद्योगांच्या खाजगीकरणाची कितपत आवश्यकता आहे हा मुद्दा पण चर्चिला जाईल. बदलत्या भांडवल बाजाराच्या प्रवृत्तीवरून बचतीला प्रोत्साहन दिले जाईल. सार्वजनिक उद्योगांनीही त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करावी. असे झाल्यास निर्यातीत १० टक्के वृद्धी होण्याची शक्यता आहे.
 औद्योगिक विकास जर मागासलेल्या क्षेत्रांमध्ये करायचा असेल तर भूमी व पाणी व्यवस्था पाहणे आवश्यक आहे. स्थानिक विकासाच्या बाबतीत विचार करूनच व ठराविक योजना तयार करुन पावले उचलावी लागतील.
 पुरवठ्याच्या बाजूचा विचार केला तर औद्योगिक रचनेला विस्तारित करणे, संयोजकिय आधार व तांत्रिक क्षमता वाढविणे, वित्तीय संस्थांना वाढविण्यास वाव देणे या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे.
 रोजगारनिर्मिती हा प्रमुख उद्देश आठव्या योजनेचा राहील. जर निर्यातीत वाढ, संरचनात्मक विकास व उपभोक्त्यांच्या मागणीमध्ये वृद्धी केली तर रोजगारात वाढ होऊन औद्योगिक विकास तीव्र होऊ शकेल. औद्योगिक विकास तीव्र व्हायला हवा हाच निव्वळ उद्देश नसावा, तर उद्योगांमध्ये आर्थिक क्षमता, स्पर्धा करण्याची प्रवृत्ती, तांत्रिक आधार या सर्व बाबीही वाढल्या पाहिजेत.
 श्रमप्रधान उद्योगांना प्राधान्यता मिळावी हे देशात श्रमाची विपुलता असल्याने वाटणे सहाजिक आहे. तरी आठव्या योजनेत रोजगारनिर्मितीबरोबर भांडवलप्रधान उद्योगांना बळकट करण्याचा विचार आहे. लघुउद्योगांमध्ये होणारी गुंतवणुकीची सीमा वाढवून साठ लाखापर्यंत केली आहे. सहाय्यक उद्योगांचीही सीमा ७५ लाखापर्यंत वाढविली आहे, असा विरोधाभास आठव्या योजनेच्या तयारीत दिसत असल्याने महत्त्वपूर्ण उद्दिष्टे कितपत पूर्ण होतील याबाबतीत शंकाच आहे.

 शेवटी असे म्हणता येईल की, योजना आयोगाने जरी उद्योगांना सर्व प्रकारे विकसित करण्याचा प्रयत्न केला असला तरी बऱ्याच क्षेत्रांमध्ये विकास

अर्थाच्या अवती-भवती । ७८