पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १. बंद अर्थव्यवस्था अस्तित्वात आहे. विदेशी व्यापार नाही.
 २. अर्थव्यवस्थेत दोन क्षेत्रे आहेत. उपभोग्य वस्तू क्षेत्र आणि भांडवली वस्तू क्षेत्र. यात मध्यवर्ती क्षेत्राचा समावेश नाही.
 ३. मांडवली साधने एकदा एका क्षेत्रात लावली की, ती साधने दुसऱ्या क्षेत्राच्या उपयोगाकरिता लावता येणार नाही.
 ४. किंमतीमध्ये बदल होणार नाही.
 ५. गुंतवणूक ही भांडवली वस्तूंच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे.

 1) Bhagwati J.N. and Chakrabortys : Contribution to Indian Economic Analysis-A Survey P.6, 1956.
 औद्योगिक गुंतवणूक फक्त भांडवली वस्तूंच्या निर्माणाकरीता वळविण्यात आली. एकच बाजू मॉडेलमध्ये मांडण्यात आल्यामुळे भरपूर टीका झाली. प्रो. महालनोबिस रशियाच्या औद्योगीकरण पद्धतीकडे आकर्षित झाल्याने भांडवली वस्तूंच्या उत्पादनावरच अधिक भर दिला व भारी उद्योगांचा विकास करण्याचे ठरविले. हे स्पष्ट आहे की, नियोजन मंडळाने आंतरऔद्योगिक संबंधांना महत्त्व न देता फक्त औद्योगिकरणाकडेच भर दिला. शेवटच्या दोन वर्षात असे लक्षात आले की, अस्तित्वात फक्त मूलभूत उद्योगावर भर देऊन देशाचा विकास संतुलित झाला नाही व लघु आणि कुटिर उद्योगाचा विकास मागासलेला राहिला.

तृतीय योजना
 तिसऱ्या योजनेमध्ये असे ठरविण्यात आले की, अर्थव्यवस्थेच्या तीव्र आर्थिक विकासासाठी मुलभूत उद्योगांना उदाहरणार्थ लोखंड, पोलाद, वीज व्यवस्था इत्यादी मोठ्या स्तरावर स्थापित करणे आवश्यक आहे. असे न केल्यास देशाचा औद्योगिक विकास मागे पडेल व अर्थव्यवस्था आत्मनिर्भर होणार नाही. देशाची मोठी लोकसंख्या आणि समृद्ध संसाधनांचा उपयोग यात ताळमेळही बसला पाहिजे. उत्पादनाच्या वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक उद्योगांमध्ये करणे आवश्यक आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी संतुलित


Photo source : www.samsungsd

अर्थाच्या अवती-भवती । ७२