पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 योजना आयोगाने तयार केलेल्या उद्दिष्टांना पूर्ण करण्याकरिता बॉम्बे प्लान (हेरॉल्ड-डोमर मॉडेल) १९५५ साली तयार करण्यात आला. यात महत्त्वाचे म्हणजे बचतीच्या सरासरी आणि सीमांत लाभ क्षमतेत फरक केलेला आहे. असा उल्लेख प्रो. जगदीश एन. भगवती व प्रो. सुखमोय चक्रवर्ती यांनी केला. याच मॉडेलला जेन टिनबर्जनने प्रथम टर्कीच्या नियोजनाकरिता वापरले. याचा उपयोग मूलभूत व्यापक अर्थशास्त्रीय अध्ययनाकरिता उपयुक्त होता. पण, व्यवहारात येणाऱ्या अडचणींमुळे या मॉडेलचा फारसा उपयोग होऊ शकला नाही.
द्वितीय योजना:
 प्रथम योजनेतील औद्योगिक विकासाला पुढे येण्याकरिता दुसऱ्या योजनेत उद्योगांना खऱ्या अर्थाने महत्त्व देण्यात आले. कारण, वाढत्या लोकसंख्येबरोबर रोजगार निर्मिती करणेही तेवढेच आवश्यक होते. समाजवाद व नियोजन याचा समन्वय करून श्रमप्रधान उद्योगांची स्थापना व त्यांचे विकेंद्रीकरण करण्याचे ठरविले. उपभोग्य वस्तूंच्या मागणीला पूर्ण करण्याकरिता या उद्योगांना महत्त्व देण्यात आले.
 दुसऱ्या योजनेची रचना औद्योगिक विकासाची असल्याने भांडवली वस्तू उद्योगांकडेही लक्ष दिले गेले. याला प्रो. पी. सी. महाल नोबिसच्या दोन- क्षेत्रीय विकास मॉडेलमध्ये मांडण्यात आले. फील्डमॅन यांनी १९२० साली हे मॉडेल सोव्हिएट संघ रशियात तयार केले आणि पुढे याला डोमर यांनी विकसित केले.
 मूळ मॉडेल जे प्रो. महाल नोबिस यांनी सांगितले ते खालीलप्रमाणे आहे.

वर्तमान गुंतवणुकीचा प्रवाह = It आणि

        It

AKIt Aclc

  AK : भांडवली वस्तुच्या क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण.
  10 : उपभोग्य वस्तुच्या क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण.
 तेव्हा : It-It-1= AK, Bk, It-1

 या सूत्रावरून मुख्य बाब अशी लक्षात येते की, उपभोग किंवा प्रक्षनाचा तुलनात्मक वृद्धि दर सतत बदलतो. वरील मॉडेल काही गृहितकांवर आधारलेले आहे.

अर्थाच्या अवती-भवती । २१