पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उभारणे तितकेसे सोपे नसते. प्रत्यक्षात हे सर्व घडवून आणण्याकरिता बरीच काळजी घ्यावी लागणार आहे. ग्रामीण क्षेत्राच्या औद्योगिकरणाच्या वाढीकरिता याच प्रकारे विशेष लक्ष देण्याची गरज राहणार आहे. खादी ग्रामोद्योग व लघु उद्योगांना परत चालना मिळू शकेल, असा संकेत आहे व हीच काळाची गरज देखील आहे.

मानवीय विकासाकरिता राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न
 अन्नाचा पुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, निवारा यात सातत्याने वाढ होऊन तळागाळातील लोकांपर्यंत ह्या सर्व सोयी पोहोचल्या पाहिजेत, यात दुमत नाही. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. अमर्त्य सेन यांचे विचार व मानवीय निर्देशाकासंबंधित विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न होत आहे हे स्तुत्य आहे. या बाबी सादर अर्थसंकल्पात आल्या नसल्या तर आश्चर्यच वाटले असते. खाजगीकरण आणि जागतिक स्पर्धेसाठी मानवीय विकासावर भर देण्याची आवश्यकता आहेच.

उद्योग व संरचनेचा विकास

 उद्योगांमध्ये आलेली मंदी व अनिश्चितता यावरही विचार होणे गरजेचे आहे. कारण हा आर्थिक रोग फक्त भारताशी संबंधित नसून जागतिक पातळीचा देखील आहे. याकरिता श्री.सिंहा यांनी प्रत्यक्ष कर सुचविले आहेत. उद्योगपतींना १०% वाढवलेल्या (सरचार्ज) अबकारी कराबद्दल नाखुशी व्यक्त करून येणारा काळ उद्योगाकरिता कठीण जाईल असे मानले आहे. त्यातून सरकारी उत्पन्नात वाढ होऊन बरीच धनराशी औद्योगिक विकास व त्याच्या संरचनाकरीता वळविता येईल. नुकत्याच विकास मार्गाकडे वाटचाल करणाऱ्या उद्योगांना हे जड जाणार आहे. उद्योगाच्या विकासाकरिता भांडवली बाजार सशक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. ते सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या लक्षात

अर्थाच्या अवती-भवती । ६६