पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केंद्रिय अर्थसंकल्प (१९९९-२०२०)

=== तळागाळातील लोकांचा विचार ; पण ===
=== मध्यमवर्गाची कंबरमोड ===

 वाढत्या मंदीच्या काळात या वर्षीच्या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून आपण उत्सुकतेने बघत होतो. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सकाळी ११ वाजता या दशकाचा अंतिम अर्थसंकल्प सादर झाला. मा. यशवंत सिन्हा यांनी कृषी व उद्योगांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा सुचविणारा अर्थसंकल्प मांडला आहे.
 या दशकाच्या सुरुवातीपासूनच आपण बाजार व्यवस्थेकडे वळलो आहोत. आणि अनेक आर्थिक बदल व अरिष्ठ आपल्या जवळच्या देशांना सोसावे लागल्याने त्याचा परिणाम भारतावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे झाला आहे. मुख्य म्हणजे जागतिक मंदीचा परिणाम आपण भोगत आहोत.
 १९९७ पासून किंमत वाढ भारतामध्ये झाली आहे, असे श्री. सिन्हा मान्य करून म्हणतात की, या वाढीला ५ टक्क्यांच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी हे लक्षात घ्यायला हवे की, किंमत वाढ जर ४ टक्के असेल तर प्रत्यक्षात (ग्राहकांपर्यंत या वस्तू पोहचेपर्यंत) ती ६ टक्के झालेली असते, म्हणजेच ती साधारणपणे २ टक्क्यांनी वाढलेली असते. प्रत्यक्षात सामान्य ग्राहकांना कोणत्याही आवश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेली अल्प वाढ बरीच बोचणारी असते.

Photo source esakal.com

अर्थाच्या अवती-भवती । ६४