पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देशाची प्रगती कशी होईल. कमी उत्पादकता अधिक खर्च या सार्वजनिक उद्योगांच्या समस्या आहेत. ह्या समस्यांना आळा बसू शकेल काय. प्रस्तुत लेखीकेस तरी असे वाटते की, सार्वजनिक उद्योगांचे व्यवस्थापन खासगी उद्योगांच्या व्यवस्थापनापेक्षा खालावलेले आहे. खाजगीकरणामुळे व्यवस्थापन दर्जा खरोखरच सुधारला जातो. सार्वजनिक उद्योगांचे प्रमुख दोष म्हणजे उद्दिष्ट्ये स्पष्ट नसणे, स्पर्धामुक्त नसणे इत्यादी. खाजगीकरणामुळे या समस्या काही प्रमाणात दूर होऊ शकतात.
 मिश्रित अर्थव्यवस्थेचाही येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. स्वीडन व भारत याचे चांगले उदाहरण आहे. स्वीडनमध्ये खाजगीकरण करण्याकरिता टेक-ओव्हर हा प्रकार मोठ्या प्रमाणात आढळतो. मात्र भारतात फारच कमी दिसतो.
 भारतीय अर्थव्यवस्थेत काही क्षेत्रात स्वातंत्र्य दिलेले आहे. खाजगी क्षेत्रांना विकसित केलेले आहे. १९५६ च्या औद्योगिक धोरणानंतर बऱ्याच क्षेत्रात खाजगीकरण करण्यात आले. अनेक क्षेत्रांमध्ये ठेका (करार) देऊन आर्थिक विकास केला आहे. म्हणजे विशिष्ट क्षेत्रांचा विकास करण्याकरिता खाजगी कंपनीला त्या क्षेत्रातील कार्य पूर्णपणे सोपविले जाते. या प्रबंधनाचे कार्य ती खाजगी कंपनी बघते.
 ब्रिटन, ब्रिटिश, कोलंबिया, टर्की, युगांडा इत्यादी देशांचा विशेष अभ्यास या पुस्तकात वेगवेगळ्या लेखकांनी केला आहे. या देशांमध्ये खाजगीकरण विकसित झाले आहे. संरचनात्मक बदल, वित्तीय बदल, निवारा व्यवस्था, अधिकोषण व्यवस्था आदी विभागांचा विकास खाजगी क्षेत्रात केलेला आहे. आपापल्या समस्या व अनुभव त्यात मांडलेले आहेत.

 फ्रान्स, अंगोला, कार्गो हे सर्व देश आता खासगीकरणाकडे जात आहेत. ब्रिटनच्या नवीन खाजगीकरणाच्या रचनेत वेगळाच राजनैतिक दृष्टिकोण आहे. लोकांना पेढीची विक्री वैकल्पिक हिस्सेधारक म्हणून होईल. त्यांनी भविष्यात खाजगीकरणाला प्रतिसाद मिळेल व पुनरराष्ट्रीयीकरण प्रवृत्तीचा विरोध होईल. या तत्त्वांच्या आधारावर संपूर्ण जगात खासगीकरणाला अधिक प्रतिसाद मिळू शकेल, असे प्रतिपादन केले आहे. खरेतर प्रस्तुत लेखिकेच्या मते, कुठल्याही स्वरूपात संपूर्ण खाजगीकरण हे कोणत्याच देशाच्या आर्थिक समस्यांचे निराकरण करू शकले नाही. काही वर्षांपूर्वी खाजगीकरण हा शब्द कुठेच वापरला जात नव्हता. पण, आता हा आर्थिक आणि राजनैतिक शब्दकोशात सर्रास वापरला जातो. जेव्हा काही क्षेत्रांमध्ये विकास खुंटतो, उद्योग आजारी पडतात किंवा सरकार या क्षेत्रांना विकसित करू शकत नाही तेव्हा त्यांचे

अर्थाच्या अवती-भवती । ५५