पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवस्थापन खाजगी क्षेत्राकडे दिले जाते.
 ब्रिटिश अनुभवावरून दिसून येते की, खासगीकरणामुळे आर्थिक व राजनैतिक फायदे कसे मिळालेले आहेत. खरे पाहिले तर खाजगीकरणामुळे सामान्य जनतेला आपल्या मालकीचे भांडवल करता येईल असे फार कमी आढळून येते. याच्यात जोसेफ शुंपीटरच्या वाक्याची नोंद घ्यायला हवी. त्यांच्या मते सर्व संपत्तीचे अधिकार एकसारखे नसतात. ज्यांच्या आधारावर (त्याच्या कौशल्याप्रमाणे) ते निष्ठा निर्माण करू शकतील किंवा त्यांना राजनैतिक पाठिंबा मिळू शकेल. मालकीहक्काला अमूर्तरूपात पाहिले तर सामान्य जनतेने ठेवलेल्या भागभांडवलाचा साठा, व्यवसाय, रोजगार इत्यादींच्या मालकी हक्काच्या तुलनेत फार कमी निष्ठा निर्माण करतो. ब्रिटनमध्ये तर राष्ट्रीयीकरण व गैरराष्ट्रीयीकरणाच्या चक्राचा अनुभव आहे. श्रीमती थॅवर यांनी खाजगीकरणाची रचना या चक्राला मोडून मालकी हक्क वाढवणे यावर अधिक भर दिलेला आहे मालकी वाढविणे यावर अधिक भर दिला आहे.
 या पुस्तकात खाजगीकरण कितपत उपयुक्त आहे याची चर्चा केली गेली आहे. आणि शेवटच्या विभागात त्याला यशस्वी करण्याचे मार्ग सुचवले आहेत. खाजगीकरणामुळे एकाधिकार पसरतो. पण सार्वजनिक एकाधिकारापेक्षा खाजगी एकाधिकार बरा, असेही सांगितले आहे. बऱ्याच बाबी सांगताना क्षेत्रिय समतोल प्रभावित होईल का, या विषयावर पुस्तकात कुठेही चर्चा झालेली नाही. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. कारण जिथे कच्चामाल, नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता आहे तिथे खाजगी कंपनी विकसित होणार व बऱ्याच अल्पविकसित देशांमध्ये प्रमुख्याने जिथे क्षेत्रफळ आहे तिथे काही ठिकाणी उद्योगांचे केंद्रीकरण होण्याची शक्यता असते. त्यामुळे क्षेत्रीय असमतोल व शहरीकरण वाढेल तेव्हा अशा प्रश्नांना सोडविण्यासाठी खासगीकरण मदतगार ठरेल काय. पण, वास्तविक खासगीकरण कोणत्याच देशाच्या सर्व आर्थिक समस्यांचे निराकरण करू शकणार नाही, असे सामान्यपणे दिसते. खाजगीकरणाचे दोष लक्षात घेऊन अल्पविकसित देशांना या पद्धतीचा पूर्णपणे वापर करणे शक्य नाही. अनेक क्षेत्रे जिथे सरकारला सामाजिक सेवा करायची आहे किंवा जनकल्याण साधायचे आहे तिथे नफा कमविणे हा भाग महत्त्वाचा नसतो. लोकांना कमीत कमी खर्चात वस्तू व सेवा उपलब्ध होतील यात वाकडे अधिक लक्ष दिले जाते.

 (या ग्रंथ परिचयाच्या लेखनात डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांचे मार्गदर्शन लाभले.त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.)

अर्थाच्या अवती-भवती । ५६