पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मागासलेल्या घटकांनाही काही प्रमाणात निश्चित उपयोग होऊ शकेल.
 खाजगीकरण हे सार्वजनिक क्षेत्रात वेगळ्या प्रकारे उपयोगी असू शकते. पण शिक्षण, आरोग्य व पाणीपुरवठा या क्षेत्रात अनेक अडचणी येतात. कारण सरकारला कर्जाची परतफेड करावी लागते. दूरसंचार व्यवस्था, वीजव्यवस्था, वाहतूक व्यवस्था या क्षेत्रांमध्ये खाजगीकरण उपयुक्त ठरू शकते, असे दक्षिणपूर्व आशियाई देश, चीन, धाना मध्ये घडलेले आहे.
 ज्या देशांमध्ये कृषी व कृषीवर आधारलेल्या उद्योगांना राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त वाटा असतो तिथे खाजगी कृषीवर आधारित उद्योगांवर अधिक भर दिला जातो. बांगलादेश आणि सहारा या देशातील काही कृषी-आधारित उद्योग खाजगी क्षेत्रातच अधिक प्रगत झालेले आहेत. सरकारी हस्तक्षेप जर कृषी व्यवस्थेतून काढला तर कृषी उत्पादकता अधिक वाढू शकेल. पण शेतकरीवर्गाला प्रोत्साहन देणे एवढेच आवश्यक आहे. (पान क्र.१४६)
 लॉरेन्स एच. व्हाईट यांच्यामते, अधिकोषण व्यवस्था अविकसित देशांमध्ये वित्तीय क्षेत्राला पुढे येऊ देत नाही. खाजगी अधिकोषण व्यवस्था चांगल्या पद्धतीने कार्य करीत असल्यास काही अडथळे येतात. उदा. व्याजदरावर नियंत्रण ठेवता येत नाही. अधिककोषण व्यवस्थेत मुक्तप्रवेश, केंद्रिय सरकारला येणारा उत्पन्नाचा तोटा हा सर्वात मोठा अडथळा आहे. त्याकरिता नवीन नोटा छापून चलनात टाकाव्या लागतात. लॅटिन अमेरिकेत असा प्रयोग झाला आहे.
 चिली या देशाच्या कर्जाची देवाण-घेवाण (डेड-स्वेप)बद्दल नमूद केले आहे की, चिलीने कर्जाची देवाण-घेवाण चांगल्या पद्धतीने राबविली. त्यांनी खाजगीकरणाकरिता वित्तपुरवठ्याचे स्त्रोत मिळवून अधिक विकास केला आहे.
 पीटर यंग आणि मॅडसेन पेरी यांच्यामते, पाश्चात्त्य देशांमध्ये खाजगीकरण करण्यात सरकार दुय्यम स्तरावर कार्य करते. मात्र अर्धविकसीत देशांमध्ये सरकारला मात्र जबाबदारी घ्यावी लागते. खाजगी क्षेत्रांना सल्ला द्यावा लागतो. अर्थातच प्रत्येक अर्थव्यवस्थेची खाजगी क्षेत्राकडे लक्ष देण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
 सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करणे ही आधुनिक काळात एक फॅशन झाली आहे. काही दशकांपूर्वी खासगी उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले जात होते. इंग्लंडमध्ये श्रीमती मार्गारेट थापर यांनी सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करण्याचे कार्य केले आहे. अशा बदलत्या परिस्थितीमुळे याचे देशांवर काय परिणाम होतील याचा उल्लेख यंग आणि मडसेन यांनी या विभागात करायला

होता. भारतीय संदर्भात असे विचारता येईल की, खाजगीकरण केल्यामुळे

अर्थाच्या अवती-भवती । ५४