पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या निबंधात मांडल्या. औद्योगिक देशांमध्ये खाजगीकरण एका गतिशील व्यवस्थापनाच्या शोधात आहे. तर अर्धविकसीत देशांमध्ये त्याला महत्त्व दिले जात नाही. बऱ्याच देशांमध्ये खाजगी उपक्रमांचे एकाधिकार स्थापित होण्याची शक्यता असते व नफा न मिळण्याची भीती असते. शिवाय राजनैतिक जोखीमसुद्धा असते. खाजगीकरणाच्या खऱ्या समस्या ह्या बेरोजगारीत वाढ, भ्रष्टाचार, भांडवलाची कमतरता, तोटे होणे इत्यादी आहे. खाजगीकरण करताना अनेक राजकीय अडथळे येतात. खाजगी संपत्ती अधिकाराबद्दल सैद्धांतिकदृष्ट्या पहिले तर असे खासगी उपक्रम की, जे खाजगी संपत्तीच्या अधिकारावर आधारलेले आहेत. ते सार्वजनिक उपक्रमांपेक्षा अधिक क्षमतेचे असतात.
 तसेच म्यनुअर टारियो यांनी काही देशांना विचारात घेऊन खाजगीकरण आणि राजनैतिक तत्त्वे यांचा संबंध दर्शवला आहे. खसगी उपक्रम आता सर्वत्र पसरलेले आहेत. पण प्रत्येक देशात वेगवेगळी परिस्थिती आहे. खाजगीकरण यशस्वी करण्यासाठी भविष्याचा विचार (दीर्घकाळात निर्माण होणाऱ्या अडचणींची संभवना व त्यावर तयार केल्या जाणाऱ्या योजना) अधिक करायला हवा व खासगीकरण विकसित होण्यासाठी देशातील व्यक्तींचा कामात प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा आहे. (प्रो. टर्नारियो, पान ५५, परिच्छेद २.३३).
 भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगीकरणाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला, असा उल्लेख केला आहे. पण नंतर मंदस्फीती निर्माण होणे, उत्पादन कमी-जास्त प्रमाणात होणे, गुंतवणूक योग्य क्षेत्रात न होणे, कर्जाचा भार वाढणे व मुद्रास्फीती येणे अशा अनेक अडचणी आल्या याचा स्पष्ट उल्लेख नाही. ही परिस्थिती समाजवादी अर्थव्यवस्था व भारतासारख्या मिश्रित अर्थव्यवस्थांमध्ये दिसू लागली. त्यामुळे मोठ्या कंपनीच्या स्थापनेत बऱ्याच अडचणी आल्या. त्या गोष्टींचा विचार अधिक होणे आवश्यक आहे.
 खाजगीकरणाकरिता नियोजन व त्याच्या तयारीकरिता चार विभाग सांगितले असून त्यांची १४ तत्त्वे मांडलेली आहेत. त्यात संस्थागत विकास, लक्ष्यांची निवड, खाजगीकरण करण्याच्या पद्धती व त्यांच्यातील बदल व मुद्रासंबंधी निष्कर्ष असे चार विभाग आहेत. खाजगीकरणासंबंधी निर्णय कसे घ्यायचे याचीही चर्चा केलेली आहे. अनेक कंपनीने सिद्ध केले आहे की, खाजगीकरण केल्याने त्यांच्यात अधिक क्षमता वाढू शकते. लेखकाच्या मते कमीतकमी संसाधने वापरून जर अधिक गुणवत्ता व संख्या टिकून राहत असेल तर खाजगी कंपन्या सुरू करण्यात अर्थ आहे. अमेरिकेच्या उदाहरणावरून असे लक्षात येते

की, तिथे अनिश्चितता हा एक खाजगीकरणाचा महत्त्वाचा घटक आहे.

अर्थाच्या अवती-भवती । ५२