पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लेखांतूनही मिळते. 'एडयुर्ड हायमेन' म्हणतात की, परंपरागत अर्थतज्ज्ञांनी अशा अर्थव्यवस्थेतील आर्थिक पद्धतीला आपल्यासमोर आणले आहे. जी व्यक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय राहू शकते व वाढू शकते. अशी स्वयंचलित अर्थव्यवस्था विशेष बुद्धिमत्ता प्राप्त असलेल्या भांडवलशाही व्यवस्थेत चालू शकते. असे मान्य करणे तर्कशुद्ध वाटत नाही.
 जोसेफ शुम्पीटरच्या मते, एकोणिसाव्या शतकात उदारमतवाद व त्यासंबंधी विचारांचे स्वरूप विश्लेषणात्मक नाही. जॉर्ज स्टिगलरने स्वहिताच्या तत्त्वावर प्रखर टीका करताना म्हटले की, संबंधित मांडलेले विचार अनावश्यक गुंतागुंत निर्माण करतात. या विचाराला खालील तीन मुद्द्यांमध्ये मांडून स्टिगलरने टीका केली आहे.
अ) व्यक्तीला स्वहितासंबंधी सत्य परिस्थिती माहित असतानाही त्याला अशा स्थितीत त्याच्यावर होणाऱ्या परिणामांची जाणीव नसते.
ब) एक उद्योजक जर आपल्या कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवू शकत नसेल तर कर्मचाऱ्यांचे वागणे त्याच्याविरोधात होईल.
क) सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत स्टिगलर म्हणतात की, स्वहित व्यक्तीला योग्य प्रमाणात सार्वजनिक वस्तू किंवा सेवेचा पुरवठा देण्यास अडथळा निर्माण करेल.
 असे उदारमतवादी स्वरुप स्टिगलर यांना पटले नाही. त्यांच्या मते, व्यक्तीत असलेले दोष त्यांच्या स्वहिताला अधिक बळकट बनवितात व अहिताचे स्वरूप पुढे फोफावते. अर्थशास्त्रात हिताच्या दृष्टीने जर मत मांडायचे असेल तर उदारमतवादाच्या विचारसरणीतून स्वहिताची कल्पना किंवा व्यक्तीपुढाकाराला प्रतिबंधित करणे आवश्यक ठरेल. व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व दिल्यास समूहात राहणाऱ्या व्यक्तींचा किंवा सामान्य माणसांच्या हिताचा विचार होऊ शकणार नाही.
 एकोणिसाव्या शतकातील तज्ज्ञांनी मान्य केले होते की, मुक्त बाजाराचे धोरण अंमलात आणल्यास आर्थिक कुशलता वाढेल. प्रामुख्याने या व्यवस्थेत सर्वार्थी कुशलतेला वाढविण्याकरिता अधिक भर दिला गेला. परंतु अशा मार्गावर मात्र अत्यंत कमी महत्त्व दिले गेले. ज्याच्या माध्यमातून संस्थांमध्ये मानवाला उत्पादनाचे एक प्रमुख घटक म्हणून मान मिळेल व व उत्पादनकार्यात विशेष स्थान मिळू शकेल. प्रत्यक्षात हा मुद्दा अधिक महत्त्वाचा असतो, यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते. श्रमविभागणीचे तत्त्व मांडताना आधुनिक यांत्रिकीकरण येणार आणि मुक्त बाजारपेठ असल्यास अधिक सरळमार्गाने

यांत्रिकीकरण राबविता येईल, याची चर्चा मोठ्या प्रमाणात एकोणिसाव्या

अर्थाच्या अवती-भवती । १४