पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शतकात झाली. पुढे असे विचार भांडवलशाही अर्थव्यवस्थेत अंमलात आणण्यात आले. विदेशी व्यापार वाढविण्यासाठी जे आर्थिक अडथळे होते ते बरेच शिथिल करणे हा एक राजकीय भाग आहे. त्यांनी बाजाराचा विस्तार करता येतो, तांत्रिक क्षमता वाढते, असा दृष्टिकोन भांडवलवादाच्या संदर्भात रूढ झाला. वाढत्या भांडवलाचे स्वरूप व नफा तसेच शिथिलता आणल्याने वाढणारे उत्पादन व भांडवल निर्मिती हे सर्व प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
 टीकाकारांच्या मते स्मिथ व पिगु यांची स्वहिताची संकल्पना (Self Betterment) अनावश्यक खर्चांना वाढविण्यास मदत करते. विलासी वस्तूंच्या उत्पादनात भर पडते. त्यामुळे या विचारांना एकोणिसाव्या शतकात असे वळण देण्यात आले की, आर्थिक स्वातंत्र्य देण्यात यावे, परंतु अनावश्यक खर्च टाळता आला पाहिजे. लोकांजवळ अनावश्यक अनर्जित उत्पन्न जमा व्हायला नको. तसेच अर्जित उत्पन्न असून अनावश्यक खर्चात वाढ होणे चांगले नाही. ही बाब समाजकल्याणाच्या दृष्टीने अप्रत्यक्षरीत्या मांडली गेली होती. अशा चर्चेमुळे व्यापारवाद मागे पडून निरंकुश धोरणासंबंधित मत सामाजिक दृष्टिकोनातून अधिक उत्तम समजले गेले. (तसेच बाजारव्यवस्थेचे विचार स्पष्ट करताना देशी उत्पादनाचे आधिक्य विदेशात पाठवायला पाहिजे, असे विचार थॉमस मून यांनी मांडले होते.)
 मानवाची सामाजिक क्षेत्रातील भूमिका आणि उदारमतवादासंबंधी संपूर्ण बाबींवर या काळात विचार केला गेला. दोन्ही विचारांना एकत्र जोडणे शक्य नाही. म्हणून जर्मन अर्थतज्ज्ञ ऑगस्ट ऑनकेन, वॉल्टर, ऐकस्टीन या सर्वांनी अशा विचारांना छिद्र असलेले (Holistice) असे नाव दिले. सिसमॉव्ही, रॉशट, फिनिक्स या सर्वांनी या अभिमतपंथी विचारांचे समर्थन करून आर्थिक क्षेत्रातील मानवीय व्यवहाराचा अभ्यास व व्यक्तिस्वातंत्र्यासंबंधी विभिन्न पैलूंवर चर्चा केली. काही प्रमाणात आर्थिक क्षेत्रावर राज्य हस्तक्षेपाची आवश्यकता आहे, असे स्पष्ट केले. जेकब विनर यांनी सरकारी बंधने शिथिल करून निरंकुश धोरण आणता येईल याचे समर्थन केले. आंतरिक मुक्त व्यापारासंदर्भात ते म्हणाले होते की, स्थानिक करांचा अंत करणे योग्य आहे. विदेशी व्यापाराकरिता अनेक प्रकारच्या जकात करांचा अंत करणे आवश्यक आहे. उमेदवारी बंधन बंद करून व्यवसाय निवडण्याचे अधिकार देणे, मुक्त भूमिहस्तांतरण अशा बऱ्याच मुद्द्यांची सखोल चर्चा केली. परंतु, व्यापारवादावर मात्र बरीच टीका केली व त्याला हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 स्मिथने देखील व्यापारवादावर टीका केली होती. या टीकेचे समर्थन करून 'वेबलन'ने आणखीन विस्तृत स्वरूप दिले. एकाधिकारावर बंधन असले

अर्थाच्या अवती-भवती । १५