पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

क्षेत्रात संसाधनाच्या वाटणीमध्ये काम करताना व्यक्तिगत मतभेद होतात. परिणामतः या व्यक्तीवादाला सीमित करण्याकरिता किंवा संपविण्याकरिता समाजवादी धोरणाची आवश्यकता असते. सरकारी हस्तक्षेपाने या बाबी सामाजिक कल्याणाकडे वळतात. त्यात बळकट असलेल्या व्यक्तीने पूर्णपणे एकाधिकार स्थापित करू नये, असा प्रयत्न करता येतो. ही विचारधारा स्पष्ट करण्यात ‘कार्लाइल' आणि 'सुधे' यांचा मोठा हातभार आहे.
 एकोणिसाव्या शतकातील बहुतांश विचारधारकांच्या मते व्यक्ती पुढाकार जर चालू राहिला तर कोणत्याही अर्थव्यवस्थेत फारच लवकर कृषी अर्थव्यवस्थेतून औद्योगिक अर्थव्यवस्थेकडे जाण्याचे वळण लागले. आणि अशी प्रक्रिया शुद्ध बाजार स्पर्धेत बदलते. म्हणूनच स्मिथच्या विचारांमध्ये शुद्ध स्पर्धेला किंवा मुक्त स्पर्धेला अधिक प्राधान्यता दिलेली दिसते.
 स्मिथच्या सामाजिक व्यक्तीवादाला इंग्रजपूर्व केंब्रिज प्रतिष्ठित विचारवंत डेव्हिड ह्यूम व जे. एस. मिल यांनी पुढे नेले. अशा व्यक्तीवादाला वरील विचारवंतांनी 'अतियुक्तीगसंगत' (Ultrarationalism) असे नाव दिले आहे. यालाच फे. ए. हायक यांनी व्यक्तिवादाचे दोष' (Indivisualism False) असे म्हटले आहे. अशा विचारांचे प्रणेते जेरेमी बेन्थम आणि नासू सीनियर आहेत. त्यांच्या विश्लेषणात एकाधिकृत औद्योगिक भांडवलवादाचा ओढा दिसून येतो. एकोणिसाव्या शतकात हा विचार रुजला व पुढे येऊन फोफावला. त्यातून वेगवेगळ्या पद्धतीने विदेशी व्यापार वाढविण्याकरिता प्रयत्न चालू होते. खुल्या बाजारासंबंधी मांडलेले मत आणि डेव्हिड ह्यूमने सांगितलेले पेढ्यांच्या व श्रमिकांच्या मुक्त आगमन व निर्गमनाचे मत फक्त लहान स्तरातील व्यापार व युरोपातील मर्यादित व्यापाराकरिता उपयुक्त होते. सामाजिक हित व मोठ्या स्तरातील व्यापाराकरिता सरकारी संरक्षणाचा हस्तक्षेप आवश्यक होता. या पद्धतीला अधिक व्यापकता देण्याचे कार्य केन्स व त्यांच्या समर्थकांनी केले. एकोणिसाव्या शतकात औद्योगिक भांडवलवादाच्या मूळ मुद्द्यांमध्ये बराच बदल करण्यात आला. बाजार एकाधिकाराला खुल्या बाजाराचे रूप दिले गेले. त्याला काही प्रमाणात वैज्ञानिक बैठक दिली गेली. सामुदायिक संबंधातून 'अनुपस्थित स्वामित्वाला' (Absentee Ownership) मार्ग मिळू शकली.

 प्रो. केन्सने 'शुद्ध स्पर्धा' व 'ग्राहकांची सार्वभौमिकता' अशी द्विसंकल्पना मांडली आणि भांडवलशाहीच्या मुक्त बाजाराच्या व्यवस्थेत ती बसविण्यात आली. त्यामुळे 'प्रीटज्स रेडलीच' म्हणतात की, अमेरिकेत धंद्यातील रुजलेल्या लोकांनी 'अदृश्य हात' या संकल्पनेला आत्मसात केले आणि त्यातून बेजबाबदार वागणे सुरू केले. अशी माहिती जे. बी. से. डेव्हिड रिकार्डोच्या

अर्थाच्या अवती-भवती । १३