पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पद्धतीप्रमाणे या प्रकारांमध्ये संग्रहण क्षमता कशी वाढवता येईल, याचा विचार होणे आवश्यक आहे. भंडारा जिल्ह्यात या पध्दतीचा काही प्रमानात उपयोग झाला असून तो उपयुक्त ठरला आहे.

४. कोरडवाहू कृषी पद्धती
 आधुनिक पाण्याच्या व्यवस्थापनात कोरडवाहू शेतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अशा क्षेत्रातील भूमी आणि पाण्याच्या वापराकरिता विशेष नियोजनाची गरज आहे. कालव्यांच्या माध्यमातून जमिनीत ओलावा निर्माण करता येतो. आता असे संशोधन झालेले आहे आणि होत आहेत. ज्याच्यातून जमिनीत हळूहळू पाणीपुरवठा करता येईल अशा क्षेत्रातील पिकांची उत्पादकता उच्च असते आणि पर्यावरणाला धोका नसतो असेही यातून सिद्ध झाले आहे. म्हणून विदर्भाने अशा सर्व पद्धतींची अंमलबजावणी करून कोरडवाहू क्षेत्रात क्रांती आणायला हवी.
५.वनारोपन
 वनरोपनाने पाण्याचे प्रमाण वाढू शकेल. पाणी सतत झिरपत असल्यास कृषी क्षेत्राला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदा पोहोचेल. विदर्भातील अधिकांश ठिकाणी जमीन उत्तम असल्याने असे केल्यास कृषी उत्पादकता व त्याकरिता पाणीपुरवठा वाढू शकेल.

६. काटकसरीने पाण्याचा वापर
 बरेचसे पाणी घरकामाकरिता वापरले जाते. तेव्हा त्यावर थोडीफार प्रक्रिया करून त्याचा वापर पुन्हा केला जाऊ शकतो. शहरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याला शहर नियोजनाच्या कार्यामध्ये समाविष्ट करून त्याचा कृषिक्षेत्रात वापर करता येईल. पावसाच्या पाण्याला घरोघरी कसे साठवता येईल याचा विचार करायला हवा. लोक यासाठी मदत करू शकतील. त्यामुळे बरेचसे वाया जाणारे पाणी वाया न घालवता त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्याकरिता लोकांमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबद्दल जागृती करण्याची गरज आहे.

 येणाऱ्या शतकात कृषी उत्पादकता वाढवावी लागणार आहे आणि त्यामुळे पाण्याची मागणी भरपूर वाढणार आहे. त्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन करताना पुढील योजना आखताना सर्व मुद्द्यांचा विचार करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा विचार, खर्चाचा विचार करणे गरजेचे आहे. पाणी कृषी कार्याकरिता किती लांबीपर्यंत नेता येईल, याला चालना देण्याची गरज राहील. संपूर्ण कृषी विकासाकरिता सिंचन

अर्थाच्या अवती-भवती । १३०