पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवस्थेमध्ये भक्कम सुधारणा आणावी लागेल. असे केले तर विदर्भातील शेती क्षेत्राला आणखी चांगले दिवस येऊ शकतात. त्यावर आधारित लघु उद्योगदेखील स्थापित होऊ शकतात. ह्या क्षेत्राचा विकास करून विदर्भात काही प्रमाणात आत्मनिर्भरता निर्माण करता येईल यात शंका नाही. प्रथम परंपरागत पिकांची स्थिती सुधारणे आवश्यक आहे. या पिकांकरिता किती पाण्याची आवश्यकता आहे, याचा अभ्यास केल्यास पाण्याच्या व्यवस्थापनातून त्यांची स्थिती सुधारली पाहिजे. इतर पिकांच्या लागवडीचा विचार केला पाहिजे.

अर्थाच्या अवती-भवती । १३१