पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्राचा मानवीय विकास व असंघटित क्षेत्र
(डॉ.मृणालिनी फडणवीस, डॉ.संजय खडतकार)


 मानवी भांडवल देशाच्या भरभराटीला उपयुक्त आहे ह्यात दुमत नाही. ह्या भांडवलाचा उपयोग संघटित क्षेत्रात होतो की, असंघटीत क्षेत्रात ह्यावरदेखील विकासाचा वेग अवलंबून राहतो. आर्थिक विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. औद्योगिकरणात गुजरातसोबत भरघोस कामगिरी केलेली आहे. ही प्रगती पश्चिम महाराष्ट्रात अधिक झाल्याने राज्यातील विकास विभिन्नता व उत्पन्न विभिन्नता निर्माण झालेली दिसते. ग्रामीण व शहरी रोजगारावर त्याचे वेगवेगळे परिणाम दिसून येत आहे.

असंघटित क्षेत्रातील स्थिती व रोजगार
 वाढते नागरीकरण ही एक सामान्य बाब आहे. राज्यात रोजगार पुरविण्याच्या कामात स्थायी स्वरूपाचा रोजगार कमी आणि अनेक भागात असंघटित क्षेत्राचा मोठा वाटा उचलत आहे. राज्यात १९९६ ते ९८ ह्या कालावधीत रोजगाराची संख्या ८४.२ लाखांवरून ९४.७ लाखांवर गेली. ही वाढ जरी मोठी दिसत असली तरी याच कळात असंघटित क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. हा वाटा ५२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. महाराष्ट्रात रोजगार निमिर्तीत असंघटित क्षेत्राचे महत्त्व वाढत्या प्रमाणात दिसून येत आहे. उत्पादन कार्य किंवा निर्माण कार्यात करार पद्धतीने होत असलेली कामे वाढत आहेत. रस्ते, धरण निर्मिती,

NAMENTERIEN

Photo source: www.esakal.com

अर्थाच्या अवती-भवती । १२१