पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हालचाली क्रमबद्ध पद्धतीने वाढणाऱ्या असतील तर सार्वजनिक खर्च तसाच वाढतो आणि त्याची गुणवत्ता व गतिमानता सुद्धा वाढते.
 वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि मोठ्या प्रमाणात लोकांना राजनैतिक हक्कांची जागृकता इत्यादी कारणे, सार्वजनिक खर्चात अधिक वाढ करतात. सार्वजनिक खर्चाचा वित्तपुरवठा काही विशिष्ट कारणापर्यंत करता येतो. असे तेव्हाच शक्य होते, जेव्हा अर्थव्यवस्थेचा विस्तार होईल. त्यात रचनात्मक बदल करता येतील. भारतासारख्या अर्धविकसित देशांमध्ये सरकार मुद्दाम त्याचे कार्य वाढवते आणि ह्या कार्याकरिता अनेक कर लावून वित्तपुरवठा करते. विकसित देशांमध्ये ही राज्यसरकार असा विचार करते की, वाढत्या धन व संपत्तीच्या विषमतेला कमी करावे. ही अर्थव्यवस्थेची जबाबदारी आहे. यावरून लक्षात येते की, 'वाइजमॅन आणि पिकॉक'चे सर्व गृहितपक्ष सर्व विकसित अर्थव्यवस्थेला लागू पडत नाही. एका ठराविक प्रवृत्तीला दर्शवणारी व्याख्या आहे.
 असे म्हणता येईल की, लोकसंख्येत वाढ, शहरीकरण, वाढत्या किंमती, संरक्षणावरील खर्च इत्यादी तत्त्वे सोडून अशी अनेक तत्त्वे आहेत. जे सार्वजनिक खर्चात अधिक वाढ करतात व त्यामुळे अर्थव्यवस्थेची बाजारव्यवस्था विस्कळीत होते. अनेक उद्दिष्टे पूर्ण होत नाहीत. बाजारव्यवस्थेच्या नैसर्गिक प्रवृत्त्या अर्थव्यवस्थेत आर्थिक अस्थिरता, धन व संपत्तीत असमानता, उपभोग, रोजगार व गुंतवणुकीची दोषपूर्ण व्यवस्था इत्यादी त्रुटी निर्माण करतात. अनेक अर्थव्यवस्था दारिद्र्याच्या दुष्टचक्रात गुरफटलेल्या असतात. म्हणून तीव्र आर्थिक विकास होऊ शकत नाही. तेव्हा परत सरकारच्या हालचाली वाढून सार्वजनिक खर्चात वाढ केली आहे.

भारतीय अर्थव्यवस्था : काही काळापासून भारतीय सरकारच्या वाढत्या उत्पन्न खर्चाबरोबर केंद्रिय अर्थसंकल्पिय स्थिती बरीच खालावलेली आहे. मोठ्या प्रमाणात कर्ज घेणे, तुटीचे अर्थप्रबंधन आणि भांडवलाच्या हिशोबाच्या बटवड्यात कमतरता इत्यादी तत्त्वे सरकारी खर्चाला प्रभावित करणारी आहेत. इतर तत्त्वांपैकी कर्जफेडीचे हस्तांतरण करणे, व्याजाची व आर्थिक सहाय्यतेची कर्जफेड करणे इत्यादी तत्त्वे आहेत. या तत्त्वांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र प्रशासकीय खर्चाच्या बचतीत बरीच कमतरता आली आहे.

 वाढता खर्च आणि चालू उत्पन्नाच्या हिशोबात फरक म्हणजे कदाचित केंद्रिय अर्थसंकल्पाची अस्वस्थता आहे. १९८५ पासून असे दिसून येते की, भारतामध्ये उत्पन्नाच्या हिशोबाच्या तोट्यात बरीच वाढ झाली आहे. मोठ्या

अर्थाच्या अवती-भवती । १०२